पिंपरी, ता. १८ : ‘‘हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. मराठी आपली मातृभाषा आणि इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. तीनही भाषा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हिंदीला विरोध करण्याचे काही कारण नाही. काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे आता ज्यांच्याकडे काही उद्योग नाहीत, ते हिंदी भाषेला विरोध करत आहेत’’, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर शुक्रवारी (ता. १८) केली.
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चापेकर स्मारक समिती यांच्यातर्फे चिंचवड येथे उभारलेल्या चापेकर स्मारकाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असताना माध्यमांशी बोलत होते. राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या पहिलीपासून शिक्षण सक्तीबद्दल टीका केली. त्यावर पवार यांनी उत्तर दिले. यासह ‘‘नाशिक दंगलप्रकरणात आम्ही कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून गुन्हा दाखल करत नाही. जे दोषी असतील, त्यांच्यावर योग्य कारवाई करत आहोत. कुणालाही सोडले जाणार नाही,’’ असेही पवार म्हणाले.
निलंबित पीएसआयला किती गांभीर्याने घ्यायचे?
बीडचे निलंबित पोलिस उपनिरिक्षक रणजीत कासले यांनी माध्यमांशी बोलताना ‘‘कराड यांच्या एन्काउंटरची मला ऑफर होती’’ यासह अनेक आरोप केले आहेत. त्याबाबत पवार म्हणाले, ‘‘आरोपांची चौकशी केली जाईल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. निलंबित पीएसआयच्या आरोपांचा विचार किती करावा? हा प्रश्न आहे. बीडमध्ये महिलेला अमानुष मारहाण झाल्याबाबतची माहिती असून दोषींवर कारवाई केली जाईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.