पिंपरी-चिंचवड

आकुर्डी, चिंचवड, पिंपळे सौदागरमध्ये विजेचा लंपडाव

CD

पिंपरी, ता. ४ ः शहरातील अवकाळी पावसामुळे बहुतांश भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला. त्याचबरोबर आकुर्डी, चिंचवड, पिंपळे सौदागर, रहाटणी या परिसरात दिवस-रात्र विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा लवकरात-लवकर सुरळीत करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी महावितरणकडे मागणी केली आहे.

विद्युत उपकरणे जळण्याची शक्यता ः
विजेचा लपंडाव सुरु असल्याने वीज पुरवठा कमी दाबाने होत आहे. त्यामुळे घरातील विद्युत उपकरणे बिघडण्याची धोका उद्‍भवत आहे. या परिसरातील अनेक आयटी क्षेत्रातील कर्मचारी घरातून काम करत असतात. त्यांना विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे त्यांचा कामामध्ये अडथळा निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे उपकरणे बिघडल्यास, जळाल्यास याची भरपाई कोण करणार असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. वारंवार होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून विजेच्या समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच महावितरणच्या अधिकाऱ्यांना तक्रार करून देखील समस्या सोडवली जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले. पिंपळे सौदागर परिसरात रस्ते आणि पायाभूत सुविधा महापालिकेने दिल्या आहेत. अद्याप त्यावरती ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. त्यामुळे महावितरण विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. सूर आहे.

विजेच्या समस्येबाबत अधिकाऱ्यांना तक्रारीची दखल घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्याचा आढावा घेण्यात येत आहे. संबंधित परिसरात म्हणजेच, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, पिंपळे सौदागर, रहाटणी येथे कोणताही तक्रारी नोंद नाही. तरी या ठिकाणची पाहणी करून समस्येवर उपाययोजना करण्यात येईल.
- सोमनाथ मुंडे, कार्यकारी अभियंता, पिंपरी विभाग

‘‘आकुर्डी भागात काल दुपारी साडे तीन वाजता विद्युत पुरवठा खंडित झाला होता त्यानंतर रात्री साडे आठ वाजता सुरळीत झाला. मात्र, दिवसभरातून दोन-तीन वेळी विद्युत पुरवठा खंडित होत आहे. तसेच, गुरुदेवनगर आकुर्डी, आणि विठ्ठलवाडी भागातही हीच स्थिती आहे. महावितरण विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात’’
-प्रकाश परदेशी, आकुर्डी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : पुणे जिल्ह्यात नराधमाचा अमानुषपणा! चिमुरडीच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आरोपीला मिळणार मृत्यूदंडाची शिक्षा?

Latest Marathi News Live Update : कात्रज घाटात एसटी बंद पडल्याने भीषण ट्रॅफिक जॅम; वाहनांच्या ३-४ किमी लांब रांगा

Bargi Dam Accident: क्रूझ कापून वाचवले जीव! मृतांच्या कुटुंबीयांना भेटून मुख्यमंत्री भावूक, बरगी धरण अपघातावर कठोर कारवाईची तयारी

Hasan Mushrif Statement : “गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावूनच प्रतिक्रिया,” हसन मुश्रीफांनी शिवाजी पाटलांना थेट डिवचलं

Mumbai: पुनर्वसन ४० वर्षे रखडले; उच्च न्यायालयाचे केंद्र, ‘जेएनपीए’ला खडे बोल

SCROLL FOR NEXT