पिंपरी, ता. ४ ः राज्याच्या नगर परिषद संचालनालयाने महापालिकेस आठ आणि १८ टन क्षमतेची दोन अत्याधुनिक कचरा रिसायकल वाहने मोफत दिली आहेत. त्यांचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते झाले. या वाहनांमुळे शहरातील सांडपाणी वाहिन्यांमधील अडथळे वेळीच दूर करता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महापालिकेला मिळालेल्या दोन वाहनांमुळे पावसाळ्यातील समस्यांवरही प्रभावी नियंत्रण मिळवता येईल. नागरिकांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी सार्वजनिक सुविधा मिळतील. शहरातील मलनिःसारण व्यवस्थेची कार्यक्षमता आणि प्रतिबंधात्मक साफसफाई अधिक प्रभावी होईल, असा विश्वास खोराटे यांनी व्यक्त केला. उर्वरित एक संच शासनाच्या ठरावीक दरानुसार टप्प्याटप्प्याने पुढील दोन-तीन महिन्यांत मिळतील. सध्या महापालिकेकडून ठेकेदारांच्या माध्यमातून आठ रिसायकल गाड्यांचा वापर सुरू आहे. नवीन वाहनांमुळे मलनिःसारण व्यवस्थेची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.