पिंपरी, ता. १ ः ‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर दिवसेंदिवस वाढत आहे. फोटोग्राफी क्षेत्रात सुद्धा ‘एआय’चा शिरकाव झाला आहे. ‘एआय’चा वापर करुन फोटो अधिक आकर्षक बनवता येऊ शकतो. पण, ‘एआय’ हा फोटोग्राफीला पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे ‘एआय’च्या जमान्यातही फोटोग्राफीचे अस्तित्व कायम राहील,’’ असे मत छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी व्यक्त केले.
सकाळ विद्या एज्युकेशन एक्सो २०२५ निमित्त ‘फोटोग्राफीमधील करिअरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कशाळीकर म्हणाले, ‘‘प्रत्येकाच्या हातात मोबाईल पाहायला मिळतो. मोबाईलमध्ये फोटो टिपून आपल्या आठवणी जतन करू शकतो. पण, मोठ्या समारंभामध्ये मोबाईल कॅमेराद्वारे प्रोफेशनल फोटो काढणे शक्य नसते. केवळ लग्नसमारंभात केली जाते तेवढीच फोटोग्राफी नाही. तर विविध क्षेत्रांतही फोटोग्राफीला मोठी मागणी आहे. फूड इंडस्ट्री, फर्निचर इंडस्ट्रीसह विविध इंडस्ट्रीमध्ये फोटोग्राफीमध्ये करिअर करण्याची संधी आहे. फोटोग्राफी हे क्रिएटिव्ह क्षेत्र आहे. वयाच्या कोणत्याही वर्षी फोटोग्राफीला सुरुवात करता येऊ शकते. फोटोग्राफीकडे नोकरी म्हणून पाहू नका. हा एक व्यवसाय आहे. दरवर्षी फोटोग्राफी व्यवसायामध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.