पिंपरी-चिंचवड

पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने १६ लाखांची फसवणूक

CD

पिंपरी : पुणे महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एकाने सहा जणांची १६ लाख १८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. आशिष अशोक उबाळे (रा. गणेश गार्डन जवळ, दापोडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी किरण कृष्णात ठोंबरे (रा. उदमनगर, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादीची भेट घेऊन पुणे महापालिकेत आयुक्त साहेब, प्रशासन विभाग यांचा प्रशासकीय सचिव असल्याचे सांगितले. पालिकेत लिपिक आणि शिपाई पदाच्या अनुकंपा तत्‍त्‍वावरील सहा जागा रिक्त असून, तुमच्या नातेवाइकांना तेथे नोकरी लावतो, असे आमिष त्याने दाखवले. फिर्यादीचे नातेवाईक आणि मित्र मिळून सहा जणांकडून त्याने वेळोवेळी पैसे घेतले. मात्र, कोणालाही नोकरी दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठोंबरे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन फसवणूक
पिंपरी : व्हाॅट्सॲपवर पाठविलेली एपीके फाईल डाऊनलोड करायला सांगून मोबाईल ॲक्सेस घेत ज्येष्ठ नागरिकाच्या क्रेडिट कार्डमधून पाच लाख रुपये काढून घेत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली. हा प्रकार ऑनलाइनद्वारे घडला. या प्रकरणी निगडी प्राधिकरणातील ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांना त्याच्या व्हाॅट्सॲपवर आरोपींनी एपीके फाईल पाठवून डाऊनलोड करायला लावली. त्यानंतर फिर्यादीच्या मोबाइलमध्ये ॲक्सेस घेऊन त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरून चार लाख ९९ हजार रुपये काढून घेतले.

गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक
पिंपरी : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने चऱ्होली येथील एका व्यक्तीची २१ लाख ३४ हजार ३९९ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. ​याप्रकरणी एका व्यक्तीने दिघी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीला एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सामील करून घेतले होते. आरोपींनी त्यांना एका ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सुरुवातीला फिर्यादीच्या खात्यावर मोठा नफा झाल्याचे दिसत होते. मात्र, जेव्हा त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचे खाते ब्लॉक करण्यात आले. पैसे काढण्यासाठी पुन्हा १५ लाख रुपये टॅक्स भरण्याची मागणी करण्यात आली. यात त्यांची २१ लाख ३४ हजार ३९९ रुपयांची फसवणूक करण्यात आली.

बनावट चावीद्वारे अकरा लाख लंपास
पिंपरी : बनावट चावीने कुलूप उघडून घरात शिरलेल्या चोरट्याने ११ लाख २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे आगीने लंपास केले. ही घटना थेरगाव, लक्ष्मणनगर येथे घडली. या प्रकरणी एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार योगेश लहू जाधव (रा. लक्षणमननगर, थेरगाव) याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने फिर्यादीच्या घराच्या दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडले. त्यानंतर बेडरूममधील बॅगेतील ११ लाख २८ हजार रुपये लंपास केले.

जुन्या भांडणातून तरुणाला बेदम मारहाण
पिंपरी : जुन्या भांडणाच्या रागातून तीन जणांनी मिळून एका तरुणाला लोखंडी हत्याराने आणि दांडक्याने बेदम मारहाण करीत धमकी दिली. ही घटना बावधन ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडली. या प्रकरणी आर्यन अंकुश पिसोळे (रा. बावधन, पुणे) याने बावधन पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोनू लाटे, विकी लाटे आणि अतुल माने (सर्व रा. बावधन) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील कट्ट्यावर मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. तिथे आलेल्या आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ सुरू केली. आरोपी विकीने लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या हातावर मारले. तर सोनू आणि अतुल यांनी फिर्यादीला पकडून दांडक्याने व हाताने बेदम मारहाण केली. तसेच त्यांना धमकी दिली. बावधन पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.

गांजा बाळगणारा अटकेत
पिंपरी : विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एकाला पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोशी येथून अटक केली. दीपक वसंत जाधव (रा. बोऱ्हाडेवस्ती, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याला गांजा देणारी महिला आरोपी फरारी आहे. आरोपी दीपक जाधव याच्याकडून १६ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

PBKS vs MI Live : १४ चेंडूंत ४ विकेट्स! शार्दूल ठाकूरचा भन्नाट मारा... श्रेयस अय्यर आला तसा गेला, जसप्रीतचा डाव यशस्वी; Video

SCROLL FOR NEXT