मानव धर्म हा सर्वश्रेष्ठ
धर्म ः श्रीपाल सबनीस
पिंपरी, ता. १८ ः ‘‘महात्मा गांधींचा विचार जगाला विश्वशांतीकडे घेऊन जाणार आहे. सध्या जगात हिंसेचा आग डोंब उसळला आहे. सारी मानव जात भयभीत झाली आहे. या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग जगाला भगवान येशू ख्रिस्त, भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर आणि महात्मा गांधी यांचे विचार दाखवू शकतात. जगात अनेक धर्म आहेत, पण मानव धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे,’’ असे प्रतिपादन थोर साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक संघ मोरवाडी आयोजित महात्मा गांधी व्याख्यानमालेत ते बोलत होते. सबनीस म्हणाले, ‘‘महात्मा गांधी ईश्वरी अवतार नव्हते, पण सर्वसामान्य माणसातील ईश्वर जागृत करण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे होते. बॅरिस्टर, राष्ट्रपिता आणि महामानव अशी महात्मा गांधींच्या जीवनाची वाटचाल झाली.’’ बाळकृष्ण माडगूळकर म्हणाले, ‘‘व्याख्यानमाला म्हणते ज्ञान सत्र असते. व्याख्यानमालेला उपस्थित राहून लोकांनी अज्ञानांकडून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि बंधुत्वाकडून विश्वबंधुत्वाकडे जायचे असते.’’ राजेंद्र घावटे म्हणाले, ‘‘जेव्हा जगाचे एक सरकार स्थापन होईल, तेव्हा संत ज्ञानेश्वरांची ‘हे विश्वचि माझे घर’ ही कल्पना साकार होईल.’ अरविंद देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. हनुमंत गुब्याड यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.