पिंपरी, ता. १६ : राज्य शासनाने ‘पुणे इनोव्हेशन हब’ची निवड ‘हाय इम्पॅक्ट इनिशिएटिव्ह’ अर्थात समाज आणि अर्थव्यवस्थेवर परिणामकारक प्रकल्प म्हणून केली आहे. या माध्यमातून पुणे परिसराचा बंगळुरू आणि हैदराबादच्या धर्तीवर प्रमुख ‘ग्रोथ’ आणि ‘इनोव्हेशन हब’ म्हणून विकास केला जाणार आहे.
या नियोजनाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चेसाठी १५ जुलैला सर्व विभागांची ‘पीएमआरडीए’मध्ये बैठक झाली. यामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका, ‘पीएमआरडीए’ आणि उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश असून, त्या अनुषंगाने कामे होणार आहेत. या प्रकल्पाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी आणि सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन यांच्या बैठकीनुसार सर्व विभाग काम करतील. विशेष म्हणजे, या प्रकल्पाच्या देखरेखीसाठी ‘पीएमआरडीए’तर्फे स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही ‘इनोव्हेशन सिटी’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी ‘ब्रँड पुणे’ची निर्मिती केली जाईल. बंगळुरूच्या धर्तीवर ‘टेक समिट’ आयोजित केले जाणार आहे.
काय होणार
वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांतील अडचणी दूर करण्यात येतील. प्रकल्पाचा सर्वसमावेशक ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक जागांची चाचपणी करणे, भविष्यातील रोजगाराच्या संधींचा अंदाज घेऊन स्वतंत्र रोडमॅप तयार करण्यासंदर्भात कामे सुरू झाली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.