पिंपरी-चिंचवड

‘पीएमआरडीए’च्‍या नियोजनाची माहिती एका ‘क्लिक’वर

CD

पिंपरी, ता. ६ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नागरिकांसाठी ‘जीआयएस’ (जिऑग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टिम) आधारित सार्वजनिक पोर्टल सुरू केले आहे. यामुळे रिंग रोड, मेट्रो मार्ग आणि गावहद्दीची माहिती आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. तसेच नागरिकांच्या कार्यालयातील चकरा थांबणार आहेत.

या पोर्टलमुळे नागरिक, गुंतवणूकदार, विकसक आणि वास्तुविशारदांना प्रादेशिक नियोजनाची प्राथमिक माहिती एकाच ठिकाणी मिळेल. यामध्ये मंजूर प्रादेशिक योजना (आरपी), प्रस्तावित नगररचना योजना (टीपी स्कीम), गाव हद्द आणि महापालिकांच्या सीमांचा समावेश आहे. तसेच रिंग रोड, मेट्रो मार्ग, रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची माहितीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पायाभूत सुविधांसोबतच नदीची लाल व निळी पूररेषा, अभयारण्य, ‘हिल स्टेशन’ आणि संरक्षण विभागाच्या ‘बफर झोन’ची माहिती टप्प्याटप्प्याने पोर्टलवर दिली जात आहे. ‘‘विकास प्रस्ताव तयार करताना वास्तुविशारद व अभियंत्यांना या अधिकृत माहितीचा मोठा फायदा होणार असून, प्रशासकीय कामात पारदर्शकता येणार आहे,’’ असा दावा प्रशासनाने केला आहे.

नियोजन आणि विकास प्रक्रिया पारदर्शक, गतिमान करण्यासाठी ‘जीआयएस’ पोर्टल महत्त्वाचे पाऊल आहे. डिजिटल गव्हर्नन्सला चालना देत पारदर्शक व सुलभ प्रशासन देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
- डॉ. अभिजीत चौधरी, आयुक्त, ‘पीएमआरडीए’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Updates: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

INDIA VS PAKISTAN : तारीख नोट करून घ्या! सप्टेंबरमध्ये भारत-पाकिस्तान समोरासमोर... क्रिकेटचा हा महामुकाबला कुठे होणार?

Liquor Flavour Row: फ्लेवर वाद चिघळला! FSSAI च्या नोटिसांना दारू कंपन्यांचे हायकोर्टात आव्हान; नियमांवरून नवा संघर्ष

Dilip Gavit: सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला अडीच तास ताटकळत ठेवलं! दिलीप गावित यांचा राज ठाकरेंवर संताप

Karamad-Ladsawangi Accident : करमाड–लाडसावंगी रस्त्यावरील खड्ड्यांचा तिसरा बळी; भरधाव टेम्पोच्या धडकेत ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू, चालक फरार

SCROLL FOR NEXT