पिंपरी, ता. ६ ः पिंपरी चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी भामा-आसखेड धरणातून जलवाहिनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने खेड तालुक्यातील शिवे-वाकी तर्फे वाडा येथील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (ता. ६) महापौर रवी लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. तसेच गावातील प्रलंबित विकासकामे आणि प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
भामा आसखेड प्रकल्पासाठी सहकार्याच्या पार्श्वभूमीवर शिवे-वाकी तर्फे वाडा गावातील पाणीपुरवठा व जलवाहिनीची प्रलंबित कामे, अंतर्गत रस्ते, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, वीजपुरवठा, सांडपाणी व गटार व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, स्मशानभूमी व परिसराचे सुशोभीकरण, मंदिर परिसरातील आवश्यक सुविधा, सभागृह, खेळाचे मैदान, वृक्षारोपण तसेच इतर मूलभूत विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच भामा-आसखेड प्रकल्पामुळे बाधित ग्रामस्थांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर महापालिका प्रशासनामार्फत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी केली.
शिवे-वाकी तर्फे वाडा गावातील नागरिकांच्या प्रत्येक मागणीची वस्तुनिष्ठ माहिती घेऊन संबंधित विभागांमार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या न्याय्य मागण्या आणि गावाच्या विकासकामांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाल्याचे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.
ग्रामस्थांनी मांडलेल्या विविध विषयांबाबत संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यावर भर देण्यात आला. गावातील प्रलंबित विकासकामे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचे प्राधान्याने आणि टप्प्याटप्प्याने निराकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.