पिंपरी-चिंचवड

शहरातील ८६ इमारती धोकादायक; १५ अतिधोकादायक

CD

पिंपरी, ता. ७ : पावसाचा जोर कायम असताना पिंपरी-चिंचवड शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या सर्वेक्षणात शहरातील ८६ इमारती धोकादायक असून, त्यापैकी १५ इमारती अतिधोकादायक असल्याचे समोर आले आहे. मात्र, या इमारतींबाबतची कारवाई बहुतांश ठिकाणी नोटिसा बजावण्यापुरतीच मर्यादित राहिल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या नोंदीनुसार, गतवर्षी शहरात ७० धोकादायक इमारती होत्या. यंदा हा आकडा वाढून ८६ वर पोहोचला आहे. त्यामध्ये १५ अतिधोकादायक इमारतींचा समावेश आहे. चार इमारती रिकाम्या करून त्यांची संरचनात्मक दुरुस्ती करण्यात आली असून, १७ इमारतींमध्ये रहिवाशांना स्थलांतरित न करता दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच ४९ इमारतींमध्ये किरकोळ दुरुस्ती करण्यात आली, तर सात इमारती मालकांनी स्वतः पाडल्या किंवा दुरुस्त करून सुरक्षित केल्या आहेत. तरीही ७८ प्रकरणे अद्याप प्रलंबित असून, त्यात अनेक अतिधोकादायक इमारतींचाही समावेश आहे.
पावसाळ्यात जुन्या इमारती, संरक्षक भिंती किंवा जीर्ण बांधकामे कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी तयार केली जाते. यंदाही आयुक्तांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले होते. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेने यंदा एकही धोकादायक इमारत स्वतः पाडलेली नाही. बहुतांश प्रकरणांमध्ये नोटिसा बजावून पुढील जबाबदारी इमारतमालकांवर सोपविण्यात आल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सार्वजनिक जीवितास धोका निर्माण करणाऱ्या इमारतींबाबत कठोर कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेच्या स्थापत्य विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या प्रकरणांवर प्रशासन तातडीने निर्णय घेणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेकडून एकाही इमारतीवर पाडकाम नाही
महापालिकेने ८६ इमारतधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यापैकी काही मालकांनी दुरुस्ती अथवा पाडकाम केले असले, तरी यंदाच्या पावसाळ्यात महापालिकेने स्वतः एकाही धोकादायक इमारतीवर पाडकामाची कारवाई केलेली नाही.

दरवर्षी सर्वेक्षण; कारवाई मात्र संथ
पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण, नोटिसा आणि नागरिकांना सूचना देण्याची प्रक्रिया नियमितपणे राबविली जाते. मात्र, प्रत्यक्ष धोकादायक इमारती हटविण्याच्या कारवाईला अपेक्षित गती नसल्याने ही प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच राहिल्याची टीका होत आहे.

‘‘शहरातील प्रत्येक इमारत सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी संबंधित मालकाची आहे. धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. तज्ज्ञ अभियंत्यांकडून संरचनात्मक तपासणी करून त्यांच्या सूचनेनुसार दुरुस्ती अथवा पाडकाम करणे आवश्यक आहे. सार्वजनिक जीवितास धोका निर्माण करणाऱ्या अतिधोकादायक इमारतींबाबत प्रशासन कठोर भूमिका घेईल.
- अजय सूर्यवंशी, सहशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: सीना माढा व खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT