पिंपरी-चिंचवड

विद्यार्थ्यांना कामाच्या ठिकाणी मिळणार प्रशिक्षण

CD

पिंपरी, ता. १३ : निगडी प्राधिकरण येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि टाटा मोटर्स पिंपरी यांच्यामध्ये विद्यार्थ्यांना कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण (ऑन द जॉब ट्रेनिंग) हा सामंजस्य करार करण्यात आला.

प्रशिक्षणार्थी यांना औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, त्यांच्या कौशल्यांमध्ये वाढ व्हावी आणि रोजगारक्षमतेत भर पडावी यासाठी हा करार करण्यात आला. या करारामुळे संस्थेतील इलेक्ट्रीशियन, वेल्डर, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल व्यवसायातील प्रशिक्षणार्थींना टाटा मोटर्सच्या आधुनिक उत्पादन केंद्रात प्रत्यक्ष कामकाजाचे प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. उद्योगामध्ये वापरली जाणारी आधुनिक यंत्रसामग्री, सुरक्षित कामकाज पद्धती, गुणवत्ता नियंत्रण, उत्पादन प्रक्रिया, टीमवर्क आणि औद्योगिक शिस्त यांचा प्रशिक्षणार्थी यांना प्रत्यक्ष अनुभव मिळेल. उद्योग आणि प्रशिक्षण संस्था यांच्यातील समन्वय वाढवून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण कौशल्य प्रशिक्षण देणे हा या कराराचा मुख्य हेतू आहे.
टाटा मोटर्सच्या प्रतिनिधींनीही प्रशिक्षणार्थी यांना उद्योगमानक प्रशिक्षण देण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी टाटा मोटर्स प्लॅन्ट हेड (सीव्हीबीयू) सुनीलकुमार तिवारी, मानव संसाधन विभागाच्या प्रमुख आदिती गुप्ता, प्रशिक्षण अधिकारी अजितकुमार मगदुम, अरविंद काळे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, प्राचार्य बसवराज विभूते, गटनिदेशक मनीषा गाढवे, अर्जुन कदम उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

Supreme Court: ''आता ही शेवटची संधी..'' पॅकिंग फूडवरील इशाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक, सरकारसह FSSAI ला अल्टिमेटम

Snake in Railway : पुणे-दानापूर एक्सप्रेस मध्ये साप; प्रवाशांमध्ये घबराट

Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT