पिंपरी-चिंचवड

शिवसेना गटनेतेपदी विश्वजित बारणे

CD

पिंपरी, ता. २४ ः पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी विश्वजित श्रीरंग बारणे यांची निवड झाली. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या शनिवारी (ता. २४) झालेल्या बैठकीत ही निवड एकमताने झाली.
महापालिकेवर शिवसेनेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेना नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात गटाची नोंदणी केली आहे.
गटनेता निवडीसाठी पक्षाने जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर यांची नियुक्ती केली होती. खांडभोर यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली. शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना उपनेत्या, नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेवक नीलेश बारणे, नीलेश तरस, विश्वजित बारणे, नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस, रेश्मा कातळे उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

दबक्या आवाजात चर्चा
शिवसेनेत दिग्गज व अनुभवी नगरसेवक असताना खासदार श्रीरंग बारणे यांचे चिरंजीव व नवखे असलेल्या विश्वजित बारणे यांची गटनेतेपदी निवड कोणत्या निकषावर केली याबाबत शिवसेने अंतर्गत दबक्या आवाजात चर्चा असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. सुलभा उबाळे यांची चौथी टर्म असून खासदार बारणे यांचे पुतणे नीलेश बारणे यांची तिसरी टर्म आहे. तर; शिवसेना शहर प्रमुख नीलेश तरस यांनी अनपेक्षितरित्या राष्ट्रवादीचे दिग्गज समजले जाणारे मोरेश्‍वर भोंडवे यांच्यासारख्यांचा पराभव करत स्वत:सह पॅनेलमधील तीन नगरसेवक निवडून आणले आहेत. त्यामुळे उबाळे, नीलेश बारणे किंवा नीलेश तरस यांचा विचार होण्याची शक्यता वर्तविली जात होती. अशावेळी अनुभवी व दिग्गज नगरसेवकांची गटनेतेपदी वर्णी का लागली नाही, अशी चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT