पिंपरी-चिंचवड

सूर्यनमस्कार महोत्सवात आरोग्य, संस्काराचा जागर

CD

चिंचवड, ता.२५ ः पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आशाकिरण सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केशवनगर येथे जागतिक सूर्यनमस्कार महोत्सवाचा भव्य उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवात शेकडो विद्यार्थी, नागरिक, महिला, युवक तसेच योग शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महोत्सवाचे यंदाचे १२ वे वर्ष ठरले.
मोरया गोसावी क्रीडांगणावर हा महोत्सव झाला. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त (क्रीडा) पंकज पाटील, शिक्षण विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे, शिक्षण अधिकारी संगीता बांगर, संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण पालमकर, मुख्य योग शिक्षिका निर्मल गुप्ता, बाळासाहेब साठे, पतंजली योग समितीचे डॉ. अजित जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी पाटील म्हणाले, ‘‘रविवार हा सूर्याचा दिवस मानला जातो. सूर्यनमस्कार हा केवळ व्यायाम नसून आरोग्य, सकारात्मकता आणि ऊर्जेचा स्रोत आहे. सूर्य आपल्या सात घोड्यांच्या रथातून उत्तरायण प्रवास सुरू करतो, अशी भारतीय संस्कृतीमध्ये श्रद्धा आहे. त्यामुळे सूर्यनमस्काराला विशेष महत्त्व आहे.’’
विद्यार्थ्यांकडून भगवतगीतेचे पठण करण्यात आले. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना टी शर्ट, भगवद्गीता पुस्तक आणि खाऊवाटप करण्यात आले. प्रास्ताविकात पालमकर यांनी उपक्रमाचा मुख्य उद्देश स्पष्ट केला. प्रशांत गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. संगीता बांगर यांनी आभार मानले.

CWD26A02776

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT