पिंपरी-चिंचवड

सिमंडस मार्शलमधील शिबिरात २९३ जणांचे रक्तदान

CD

पिंपरी, ता. २५ : कासारवाडी येथील सिमंडस मार्शल लिमिटेड व मार्शल कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्‍तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात २९३ जणांनी रक्‍तदान केले. पिंपरी चिंचवड रक्तपेढीच्या सहकार्याने मार्शल कामगार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत भोर यांच्‍या पुढाकाराने हे शिबिर पार पडले.
शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापक कृष्णमोहन, एचआर विभागाचे प्रमुख नितीन दबडे, मार्शल कामगार संघाचे उपाध्यक्ष आशुतोष शिंदे, सेक्रेटरी सचिन जाधव, खजिनदार गणेश बाराथे तसेच कंपनीचे अधिकारी रुशाद गोकल व मच्छिंद्र ढवळे उपस्थित होते. या वेळी पिंपरी चिंचवड रक्तपेढीचे डॉ. कमलेश यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद केले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन नारायण गुरव, अभिजित वैराळे, राजशेखर आचार्य, राकेश चासकर, सुग्रीव यादव, अमोल सावंत, सचिन चासकर, सूरज जेटीथोर, मगन वसावे तसेच इतर कामगार व कर्मचाऱ्यांनी केले. कंपनीचे संचालक नवरोझ मार्शल यांनी सर्व कामगार व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मे मध्ये धावणार; २३ किलोमीटरच्या मार्गिकेचे दोन टप्प्यांत उद्‍घाटन

Dharashiv Accident: तुळजापूर-लातूर महामार्गावर भीषण अपघात; तीन वाहनांची धडक, एक ठार

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Chh. Sambhajinagar: रीलस्टारनं निवृत्त प्राध्यापकाला गोळ्या झाडून संपवलं, ४० दिवसांनी उघड; कच्च्या इंग्रजीमुळे सापडले, तिघांना अटक

Pune News : पुणे महापालिकेची टीडीआर प्रक्रिया झाली सोपी

SCROLL FOR NEXT