पिंपरी-चिंचवड

अजित पवार यांच्या पुतळा उभारणीला भाजपची मंजुरी

CD

पिंपरी, ता. ३० : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत शुक्रवारी (ता. ३०) एकमताने मंजुरी देण्यात आली.
महापालिकेचे कामकाज, वार्षिक अंदाजपत्रक, प्रभागात राबविण्यात येणारी विकासकामे, त्यासाठी होणारा खर्च, स्थायी समितीकडून घेतली जाणारी मंजुरी तसेच सभागृहातील कामकाज याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कासारवाडी येथील एका हॉटेलमध्ये भाजपच्या नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन इमारतीत अजित पवार यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. या प्रस्तावास उपस्थित सर्व नगरसेवकांनी एकमताने संमती दिली. बैठकीत आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे आणि उमा खापरे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करत महापालिकेतील कामकाज अधिक प्रभावीपणे कसे राबवावे, याबाबत सूचना केल्या. शनिवारी (ता.३१) विभागीय आयुक्तांकडे पक्षाची गटनोंदणी करण्यात येणार आहे. परंतु, निवड करण्याबाबत कोणाचे नाव अद्याप निश्चित केले नसल्याची माहिती आमदार अमित गोरखे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT