पिंपरी-चिंचवड

भाविकांची प्रवासासाठी मेट्रोला पसंती

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २० ः पिंपरी चिंचवड शहरातून पुणे शहरातील देखावे पाहण्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मेट्रो प्रशासनाने गणेशोत्सव काळात मध्यरात्री दोनपर्यंत मेट्रो चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. यंदाच्या गणेशोत्सव काळात पिंपरी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मेट्रो मार्गांवर शनिवारपर्यंत सुमारे २१ लाख ७ हजार ८०२ प्रवाशांनी प्रवास केला आहे.
शनिवारी एकाच दिवशी मध्यरात्री दोन पर्यंत ४ लाख ७८ हजार ४७७ प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. यातून मेट्रोला ६० लाख २५ हजार २७१ रुपयांचे उत्पन्न मिळाले. पुण्यातील अनेक गणेश मंडळांनी जिवंत देखावे आणि देशातील विविध देवतांच्या प्रसिद्ध मंदिरांचे देखावे साकारले आहेत. हे पाहण्यासाठी उपनगरांतून व बाहेरगावाहून नागरिक मोठ्या संख्येने शहराच्या मध्यवर्ती भागात येतात. हे देखावे रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्यामुळे नागरिकांची परत जाताना गैरसोय होऊ नये म्हणून मेट्रो प्रशासनाने गणेशोत्सव काळात म्हणजेच १७ ते २४ सप्टेंबरपर्यंत सकाळी ६ ते रात्री दोनपर्यंत आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच २५ सप्टेंबरला २४ तास मेट्रो सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गणरायाचे गेल्या सोमवारी आगमन झाले. दीड, पाचव्या दिवशीच्या गणरायांचे विसर्जन झाले आहे.
शनिवारी गौरी-गणपतीचे विसर्जन झाले. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने देखावे पाहण्यासाठी पुण्यात गेले होते. देखावे पाहण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या भाविकांनीही मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला. तसेच जलद आणि आरामदायी प्रवास होत असल्यामुळे शहरातील नागरिकांनी देखील मेट्रोला पसंती दर्शवली आहे.
स्वारगेट मार्गिकेवर सर्वाधिक प्रवासी
पिंपरी ते स्वारगेट (पर्पल लाईन) या मार्गिकेवर दोन लाख ६८ हजार ९३८ प्रवाशांनी प्रवास केला. यातून मेट्रोला ३६ लाख ८९ हजार ७५१ रुपये उत्पन्न मिळाले. तर वनाज ते रामवाडी (ॲक्वा) या मार्गिकेवर दोन लाख नऊ हजार ५३९ प्रवाशांनी प्रवास केला. यातून मेट्रोला २३ लाख ३५ हजार ५२० रुपये उत्पन्न मिळाले. या महिन्यातील आणि यंदाच्या गणेशोत्सवातील सर्वाधिक प्रवाशांची नोंद शनिवारी झाली आहे.
------------
१४ ते १९ सप्टेंबर दरम्यान मेट्रो प्रवासी संख्या आणि उत्पन्न
मार्ग ः प्रवासी संख्या ः उत्पन्न
स्वारगेट ते पिंपरी ः ११,१९,५३९ ः १,८६,४१,९७०
वनाज ते रामवाडी ः ९,८८,२६३ ः १,४१,३५,४६२
एकूण प्रवासी संख्या ः २१,०७,८०२ ः ३,२७,७७,४३२
-----------
मी पिंपरी ते कसबा मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोतून प्रवास केला. मेट्रोला प्रचंड गर्दी होती. पण, खासगी वाहने घेऊन गेलो तर पार्किंगची अडचण येते. रिक्षा किंवा कॅबने गेलो तर पैसे जास्त घेतात. त्यापेक्षा मेट्रोचा प्रवास एकदम स्वस्त, सुरक्षित आणि जलद.
- मनीषा जगताप, प्रवासी

मी शनिवारी रात्री कुटुंबासह मेट्रोने प्रवास केला. मेट्रो स्टेशनवरील गर्दीमुळे थोडा त्रास झाला. पण, खासगी वाहनांपेक्षा मेट्रोचा प्रवास चांगला होता.
- मयूर शिंदे, प्रवासी
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT