पिंपरी, ता. २ ः पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पवना व इंद्रायणी नदी प्रदूषण निर्मूलनासाठी कंत्राटदार नियुक्तीच्या ई-टेंडर प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करून त्यास मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पात्र व अनुभवी कंत्राटदारांना सहभागी होता येणार आहे.
पीएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पासाठी ऑनलाइन पद्धतीने निविदा मागविल्या आहेत. निविदा कागदपत्रे महाटेंडर्स पोर्टलवर https://mahatenders.gov.in](https://mahatenders.gov.in उपलब्ध आहेत. निविदा डाऊनलोड करण्याची प्रक्रिया शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी ५ वाजेपासून सुरू होईल. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. यापूर्वी जाहीर अटी-शर्ती व तारखांमध्ये आवश्यकतेनुसार बदल केल्याचे पीएमआरडीएने म्हटले आहे. दरम्यान, ई-टेंडर प्रक्रियेतील पुढील कोणतेही बदल, सूचना किंवा सुधारणा महा टेंडर्स पोर्टलवरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रियेवर पीएमआरडीए, पुणे महानगर प्रदेश अंतर्गत मुख्य अभियंता (अभियांत्रिकी विभाग-२) यांचे नियंत्रण राहणार आहे.
पवनेचेही प्रदूषण रोखणार
इंद्रायणी नदीसह पवना नदी प्रदूषणामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. हे लक्षात घेता नदी स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे आवश्यक तांत्रिक अनुभव व पात्रता असलेल्या कंत्राटदारांनी या निविदा प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन पीएमआरडीए प्रशासनाने केले आहे.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.