पिंपरी, ता. ४ : आजची पिढी स्मार्टफोनमध्ये अडकलेली असताना, संत तुकाराम नगरमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेच्या मैदानात बालपण पुन्हा जिवंत झाले. गॅजेट फ्री अवर्स ॲकेडमीच्या पुढाकाराने आयोजित ‘आठव म्हणजे पुन्हा बालपणात या’ या उपक्रमात खेळ, हसू आणि मोकळेपणाचा जल्लोष पाहायला मिळाला.
या उपक्रमात डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सैनिक, राजकारणी अशा विविध क्षेत्रातील नागरिकांनी पदव्या बाजूला ठेवून भोवरा, गोट्या, विटी-दांडू, कबड्डी यांसारखे पारंपरिक खेळ खेळले. या उपक्रमाचा कळस म्हणजे ५०० मुलांनी एकाच वेळी ५०० फुटबॉल किक मारण्याची कामगिरी केली. या विक्रमाबद्दल गॅजेट फ्री अवर्स ॲकेडमीला प्रमाणपत्र, पदके व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. सर्व मुलांना फुटबॉल भेट देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.