पिंपरी-चिंचवड

चिखलीत मिक्सरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

CD

पिंपरी, ता. ८ : जड वाहनांना बंदी असलेल्या रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या मिक्सरने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शनिवारी (ता. ७) सकाळी अकराच्या सुमारास चिखलीतील डायमंड चौक, कुदळवाडी येथे घडला.

वैष्णवी सुजित दिघे (वर २२) असे मृत तरुणीचे नाव आहे. सीमा बजरंग ढमाले (वर ३०) असे जखमी महिलेचे नाव आहे. याबाबत अमोल सखाराम ठोसर (वय ३६, रा. सोमाटणे फाटा) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मिक्सर चालक आरोपी बिहारी पांडुरंग जाधव (वय ४१, रा. कालेकॉलनी, आळंदी-चऱ्होली) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मेव्हणी वैष्णवी दिघे आणि एक महिला सीमा ढमाले या दोघी वैष्णवीच्या दुचाकी (वाहन एमएच १४/एफएल ०२५२) वरून जात होत्या. भरधाव वेगात आलेल्या मिक्सर ट्रक (वाहन एमएच १४/एलएल ८८०३) वरील चालकाने दुचाकीला धडक दिली. डायमंड चौकातील रस्त्यावरील अवजड वाहतुकीला बंदी आहे, असे असताना देखील मिक्सर चालकाने त्याचे वाहन या रस्त्याने आणले. या अपघातात वैष्णवी आणि सीमा यांच्या अंगावरून मिक्सरचे चाक गेले. त्यात वैष्णवी हिचा मृत्यू झाला. तर सीमा या गंभीर जखमी झाल्या आहेत. चिखली पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Students Food Poison : पुण्यात एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप

Mumbai Pollution: अत्‍याधुनिक वाहने धूळ रोखणार, अनुभवी अभियांत्रिकी संस्था, कंपन्यांकडून मागवले अर्ज

Latest Marathi News Live Update : मनमाडमध्ये आजपासून उत्तर महाराष्ट्राचे पहिल्या विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

Mumbai Vanrani: नॅशनल पार्कमधील वनराणीला पसंती, महिनाभरात ९,००० जणांची भेट; ७.५० लाखांचे उत्पन्न 

Pune District Politics: भोरमध्ये दांपत्य प्रथमच एकाच वेळी सदस्य; राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड जिल्हा परिषदेला, तर तृप्ती खुटवड पंचायत समितीला विजयी!

SCROLL FOR NEXT