पिंपरी-चिंचवड

अभिवाचन स्पर्धेत साईनाथ बालक मंदिर प्रथम

CD

पिंपरी, ता. ९ ः पिंपरी चिंचवडमधील मधुश्री कला आविष्कार व चाळीसगाव येथील रंगगंध कलासक्त न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती जागतिक मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत साईनाथ बालक मंदिर संस्थेने प्रथम क्रमांक पटकाविला. निगडीतल्या ज्ञानप्रबोधिनी विद्यालयातील नाट्य विभागात नुकतीच या स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली.
स्पर्धेत ‘अशी मी काव्यप्रेमी’ यांना द्वितीय क्रमांक त्रिवेणी कला यांना तृतीय क्रमांक तर ज्ञानप्रबोधिनी गुरुकुल यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले. वैयक्तिक अभिवाचनात रश्मी साटम, पूर्वा धारप, शिल्पा बिबीकार, रमेश वाकनीस आणि मंजिरी बाम यांनी यश मिळविले . या प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, रंगगंध चाळीसगावचे प्रतिनिधी अशोक अडावदकर उपस्थित होते. मधुश्रीचे राज अहेरराव म्हणाले, अभिनय आणि वाचन यातून अभिवाचन करावे लागते. मात्र अभिनयाला एक मर्यादा हवी. या वेळी विराम चिन्हे वाचता यायला हवी. तसेच वाचनाची संहिता पाठ असणे आवश्यक आहे. स्पर्धेत एकूण वीस संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षण नरेश गुंड व विनिता माने पिसाळ यांनी केले. माधुरी ओक यांनी प्रास्ताविक केले. रेणुका हजारे, राधिका बोर्लीकार, पी. बी. शिंदे, अजित देशपांडे, अश्विनी कुलकर्णी, चिंतामणी कुलकर्णी, नेहा कुलकर्णी, अनिकेत गुहे, सुनील देशपांडे यांनी नियोजन केले. उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत शेडगे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar Emotional Post : उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट , म्हणाल्या...

Latest Marathi News Live Update : पंढरपूर शहरात झालेल्या डबल मर्डरचे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सासरी सोन्याच्या चमच्याने जेवतात या ६ अभिनेत्री; सिनेमांपासून दूर पण प्रॉपर्टी इतकी की बुर्ज खलिफाही विकत घेतील

Pargaon News : अंकिता वाळुंज या ठरल्या सर्वात कमी वय असलेल्या विजयी उमेदवार

Gold, iPhone, Laptop Duty Free: परदेशातून ड्युटी-फ्री सामानाची मर्यादा वाढली! आता सोनं, मोबाइल, लॅपटॉपवर किती कस्टम्स माफी मिळणार?

SCROLL FOR NEXT