पिंपरी-चिंचवड

अराईज इंटरनॅशनल स्कूलचा दहावीत १०० टक्के निकाल

CD

पिंपरी, ता.२१ ः भोसरी येथील अराईज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करत शाळेचा निकाल १०० टक्के लावला आहे. यावर्षी अथर्व सलगर याने ९८.४० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला. समीक्षा पोकळे हिने ९६.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. त्याचबरोबर आयुष पावडे (९५.६० टक्के), मानसी लोखंडे (९४.८० टक्के) आणि यश दुर्गे (९४.२० टक्के) यांनीही उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा गौरव वाढविला.
एकूण २५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले असून ३२ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत कारणीभूत ठरली आहे. संस्थेचे अध्यक्ष, लातूरचे माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, संस्था उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, संस्था व्यवस्थापक मंडळी, शाळेच्या डायरेक्टर प्राचार्या डॉ. सुप्रिया जाधव, प्राचार्य गणेश पवार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Bhiwandi Fire: भिवंडीत रासायनिक कारखाना आणि तेलाच्या गोदामाला भीषण आग, थरारक Video Viral

Sharad Pawar health update : शरद पवारांचा बारामती दौरा अचानक रद्द, ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंची माहिती

Latest Marathi News Live Update : जप्त केलेलं आमचं जहाज अमेरिकेनं सोडावं, इराणची मागणी

राणी एलिझाबेथ II यांच्या १००व्या जयंतीनिमित्त आयकॉनिक ग्रीन आउटफिटमध्ये टेडी; ₹37,000 किंमतीचा हा कलेक्टर आयटम का आहे खास?

Fire News: कोलकातामध्ये मोठी दुर्घटना! प्रसिद्ध आनंदलोक रुग्णालयात मोठी आग; अनेक मजले आगीच्या भक्ष्यस्थानी

SCROLL FOR NEXT