पिंपरी, ता. २१ : सायबर गुन्हे करणाऱ्या एका टोळीतील नऊ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत ‘मकोका’ कारवाई करण्यात आली. सायबर गुन्हेगारांवर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातर्फे केलेली ही पहिलीच ‘मकोका’ कारवाई आहे. या आरोपींनी पिंपरी चिंचवड, मुंबई व मध्यप्रदेश राज्यात सायबर गुन्हे केले आहेत.
अभय बाबासाहेब पाटील, शिवतेज राजेंद्र पोटे (दोघेही रा. वाघोली), युवराज उर्फ संतोष सतीश मुदलियार (रा. निंबाळकरनगर, लोहगाव), रॉनी उर्फ पंकज मंगू गिरी गोस्वामी (रा. राजस्थान), प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी, उमेश लक्ष्मीलाल भट्ट (तिघेही रा. राजस्थान), महेश करबसपा उडचणे, राहुल बहादूरप्रसाद मौर्य (दोघेही रा. दहिसर पूर्व, मुंबई), शेख अब्दुल रहीस शेख अब्दुल रशीद (रा. समतानगर, छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी समाज माध्यमांमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली जास्त परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना गंडा घातला. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात राहून फसवणुकीची रक्कम युएसडीटी सारख्या आभासी चलनात वर्ग करून फसवणूक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.