पिंपरी-चिंचवड

पोलिसांची मिळतेय तत्काळ मदत

CD

गेश पांडे
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १ : ‘तो ११ डिसेंबरचा दिवस होता. दुपारची दोनची वेळ होती. एकजण हातात कोयता घेऊन माझ्या मागे लागला. मी जिवाच्या भीतीने पोलिसांना मदतीसाठी ११२ क्रमांकावर कॉल केला अन अवघ्या काही मिनिटांत हिंजवडी पोलिस ठाण्याचे अंमलदार त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले आणि कोयता जप्त केला. पोलिस वेळेत पोहोचले नसते तर काय झाले हे मी सांगू शकत नाही..,’ अशा शब्दांत हिंजवडीतील वाकडकर नगर येथे राहणाऱ्या वीस वर्षीय तरुणाने आपबिती कथन केली. पिंपरी चिंचवड पोलिस अशा प्रकारे वेळेत मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या क्रमांकाच्या कॉलवर पीडित व्यक्तीला प्रतिसाद देण्याची वेळ घटते आहे. अर्थात पोलिस तत्काळ मदतीसाठी धावून येत आहेत.
मागील काही वर्षांत ही वेळ कमी होत असणे नागरिकांसाठी दिलासादायक बाब ठरत आहे. आपत्कालीन परिस्थितीत पीडित व्यक्तीला तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी ११२ ही आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली (हेल्पलाइन) सुरू करण्यात आली. गुन्हेगारी प्रकार, अपघात अथवा वैद्यकीय मदत, अशा आपत्कालीन परिस्थितीत संबंधित व्यक्तीपर्यंत तातडीने मदत पोचवली जात आहे. या क्रमांकावर कॉल करणाऱ्या अनेक पीडित व्यक्तींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे.
--------------

समाधानकारक घट
मदतीसाठी कॉल आल्यानंतरचा प्रतिसाद देण्याचा वेळ मागील काही वर्षात कमी होत असल्याचा दिसून येत आहे. २०२२ मध्ये सरासरी कालावधी नऊ मिनिटे ४४ सेकंद होता. २०२३ मध्ये हा कालावधी ८.५६ मिनिटांवर आला. २०२४ मध्ये ६.१८, तर सरलेल्या वर्षात ६.०५ मिनिटांवर आला आहे. वाढलेली पोलिस ठाणी, कर्मचाऱ्यांची व वाहनांची संख्या, अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण व प्रोत्साहन, वरिष्ठांकडून वेळोवेळी घेतला जाणारा आढावा यामुळे वेळेत मदत पोहोचविणे शक्य होत आहे.
----------------------------------

डायल ११२ प्रणालीवर प्राप्त कॉलची वर्षनिहाय माहिती

वर्ष प्राप्त कॉल सरासरी प्रतिसाद वेळ
२०२२ ७००७ ०९.४४
२०२३ ८६९१३ ०८.५६
२०२४ १३०६९३ ०६.१८
२०२५ १५३९०५ ०६.०५
-----------------------

डायल ११२ प्रणालीवरील सन २०२५ मधील कॉलची महिनानिहाय माहिती


महिना प्राप्त कॉल प्रतिसाद वेळ

जानेवारी ११४०२ ०५. ३५
फेब्रुवारी १४४८३ ०५. ४७
मार्च १३०८२ ०५. ३६
एप्रिल १२८२२ ०६. २८
मे १२५७८ ०५. २७
जून ११८६९ ०५. २६
जुलै १२२९४ ०६. २१
ऑगस्ट १२९५५ ०६. ५७
सप्टेंबर १२५२१ ०६. ५०
ऑक्टोबर १३४९० ०६. २३

नोव्हेंबर १३०६६ ०६. ११

डिसेंबर १३३४३ ०५. ५९
-------------------------------------------------------

एकूण १५३९०५ ०६.०५
-----------------------------------------------------------

सन २०२५ मधील सरासरी वेळेनुसार प्रथम पाच पोलिस ठाणे

पोलिस ठाणे सरासरी वेळ

हिंजवडी ०४. ३४
वाकड ०४. ३९
दिघी ०५. २६
देहूरोड ०५. ३३
---------------------------------------

अडचणीत असलेल्या व्यक्तीला तत्काळ मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी काटेकोर नियोजन केले जात असून या कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेतला जात असतो. तसेच पुरेसे मनुष्यबळ, वाढलेली वाहनांची संख्या, अधिकाऱ्यांचे बारीक लक्ष, यामुळे पीडित व्यक्तीला वेळीच मदत देणे शक्य होत आहे. याबाबत नागरिकही समाधान व्यक्त करतात. प्रतिसाद वेळ आणखी कमी करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत.
- विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड
---------------------------------------------

फोटो
81505

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

SCROLL FOR NEXT