पिंपरी, ता. २ ः स्वच्छ मुख अभियानांतर्गत आकुर्डी येथील श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील बाराशे विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. इंडियन डेंटल असोसिएशन, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने मोफत दंत तपासणी व मुख स्वच्छता जनजागृती शिबिर राबवण्यात आले. अध्यक्षस्थानी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक डॉ. गोविंद दाभाडे, प्राचार्या संगीता गुरव, उपप्राचार्य विजय बच्चे, पर्यवेक्षक संजय कांबळे, संजय जगताप, के. डी. पोंदे उपस्थित होते. आयडीए पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष डॉ. विनय कुमार शेट्टी यांनी नियोजन केले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी दातांची घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन डॉ. शेट्टी यांनी केले. प्राचार्या गुरव यांनी आभार मानले.
---