पिंपरी-चिंचवड

निवडणुकीला लढण्यासाठी युवा मंच, प्रतिष्ठानचा ‘आधार’

CD

पिंपरी, ता. २ : निवडणुकीला सामोरे जायचे म्हटले की, समाजकार्य दाखविण्यासाठी युवा मंच, प्रतिष्ठान, संघटना असावी असा इच्छुकांचा समज असतो. त्यामुळेच निवडणुकांचे वारे वाहू लागताच अनेक इच्छुक उमेदवार आणि राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या व्यक्तींकडून युवा मंच, प्रतिष्ठान व सामाजिक संघटनांची स्थापना करण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. समाजकार्याच्या नावाखाली सुरू असलेले हे उपक्रम प्रत्यक्षात आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केलेली नियोजनबद्ध पूर्वतयारी असते.

शहरातही पिंपरी, चिंचवड, थेरगाव, ताथवडे, वाकड, रहाटणी, रावेत, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, काळेवाडी, सांगवी, दापोडी, कासारवाडी, तळवडे, निगडी, चिखली, भोसरी, मोशी, दिघी, चऱ्होली, चिंचवड आदी परिसरांतही असे अनेक युवा मंच, प्रतिष्ठान, फाउंडेशन पहायला मिळत आहेत. नव्या संघटनांची नावे आकर्षक ठेवून, बॅनर-पोस्टरवर मोठ्या अक्षरात प्रतिष्ठानाचे नाव आणि त्याखाली ठळकपणे संबंधित व्यक्तींचे फोटो झळकावले जातात. काही ठिकाणी एकाच व्यक्तीचे अनेक युवा मंच, प्रतिष्ठाने आणि फाउंडेशन अस्तित्वात असल्याचेही दिसून येते.

निवडणुकीदरम्यान कार्यक्रमांचा धडाका
रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, वाढदिवसाचे औचित्य साधून मदत वितरण, शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता मोहिमा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. मात्र हे उपक्रम निवडणूकपूर्व काळातच सक्रिय असतात, निवडणुका पार पडताच त्यांचा उत्साह मावळतो, हे यापूर्वीचे अनुभव सांगतात.

कार्य अहवालासाठी धडपड
प्रत्येक कार्यक्रमानंतर फोटो, व्हिडिओ, बातम्या आणि सोशल मीडिया पोस्ट्सचा मारा केला जात आहे. काही संघटनांकडून तर कार्य अहवाल तयार करण्यासाठीच कार्यक्रम घेतले जात असल्याची टीका होते. समाजकार्यापेक्षा ‘आपण किती कार्यक्रम घेतले’ याची आकडेवारी आणि दृश्य पुरावे सादर करण्यावर भर दिला जात आहे.

समाज माध्यमांचा प्रभावी वापर
समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करून स्वतःची प्रतिमा ‘समाजसेवक’ म्हणून उभी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लाइक्स, शेअर्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून लोकप्रियता वाढवून मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा हा प्रयत्न असतो.

खरी गरज दुर्लक्षितच
अनेक भागांमध्ये पाणीटंचाई, बेरोजगारी, आरोग्य सुविधा, रस्ते, वीज, शिक्षण अशा मूलभूत प्रश्नांवर ठोस आणि दीर्घकालीन कामाची गरज असताना, तात्पुरत्या कार्यक्रमांवरच भर दिला जात असल्याने मूळ प्रश्न तसेच राहतात.

सातत्य आणि पारदर्शकतेची गरज
खरे समाजकार्य हे प्रसिद्धीपुरते मर्यादित नसून सातत्यपूर्ण, पारदर्शक आणि परिणामकारक असते. निवडणूक जिंकणे हा उद्देश नसून समाजातील प्रश्न सोडवणे हेच जर ध्येय असेल, तरच युवा मंच आणि प्रतिष्ठानांवर जनतेचा विश्वास टिकेल, अन्यथा ही संघटना निवडणूक हंगामापुरतीच मर्यादित असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avian Influenza: देशात एव्हीयन इन्फ्लूएंझा व्हायरसची एन्ट्री! चिकन आणि अंडी विक्रीवर बंदी; 'हे' नियम पाळले नाहीत तर मोठा धोका

ती मला भेटायला का नाही आली? घराला कुलूप, अचानक झाली गायब; रजनीकांत यांचं ते प्रेम ज्याचा घाव आजही ताजा आहे

Pune Traffic Police : नववर्षाच्या रात्री पुण्यात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’वर धडक कारवाई; २०८ मद्यधुंद वाहनचालकांवर गुन्हे!

Government Decision on Gig Workers : ‘गिग वर्कर्स’बाबत सरकारचा मोठा निर्णय! ‘Social Security Cover’सह बरच काही मिळणार मात्र...

Junnar Migratory Bird : युरोपातून येणाऱ्या रेड क्रेस्टेड पोचार्डची जुन्नर तालुक्यात प्रथमच नोंद; जैवविविधतेसाठी ऐतिहासिक क्षण!

SCROLL FOR NEXT