पिंपरी-चिंचवड

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची सुरक्षा पडताळणी

CD

पिंपरी, ता. २ : हिंजवडी, माण ते शिवाजीनगर प्रकल्पाच्‍या मेट्रो सुरक्षितता व तांत्रिक मानकांची पडताळणी नुकतीच करण्यात आली. भारतीय रेल्वेच्या ‘रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन’ (आरडीएसओ) संस्थेने ही तपासणी नुकतीच पूर्ण केली. मेट्रो संचालनासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते. त्‍यामुळे हिंजवडी-माण शिवाजीनगर मार्गावर मेट्रोने प्रवासी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने निर्णायक टप्पा गाठला आहे.
या मेट्रो प्रकल्‍पाचे काम वेगाने सुरू आहे. स्थानकांच्या इमारती, प्लॅटफॉर्म, प्रवेश-निर्गमन सुविधा तसेच अत्यावश्यक सेवा जवळपास पूर्णत्वास येत आहे. हा संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी संबंधित विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला जात आहे. सध्या नियोजित वेळापत्रकानुसार कामे सुरू असून, ३१ मार्चपर्यंत पुणे मेट्रोलाइन-३ वरील बहुतांश स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या मेट्रो गाड्यांच्या (रोलिंग स्टॉक) पुरवठा झाला आहे. यासाठी १४ रेक मेट्रोला मिळाले आहेत. मंजूर वेळापत्रकानुसार एकूण २२ रेक लवकरच उपलब्ध होणार आहेत. या आधारे टप्प्याटप्प्याने चाचण्या, ट्रायल रन आणि पुढे नियमित प्रवासी सेवा सुरू करण्याची तयारी केली जाणार आहे. दरम्यान, स्थानकांवरील नागरी कामे, प्रणाली बसवणे आणि अंतर्गत सज्जता या सर्व आघाड्यांवर काम वेगात सुरू आहे, असे प्रशासनाने सांगितले.

‘आरडीएसओ’ संस्थेचे काम
‘रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन’ (आरडीएसओ) ही भारतीय रेल्वेची संशोधन आणि विकास (आर ॲंड डी) शाखा आहे, जी लखनऊ येथे आहे. ही संस्था रेल्वे उपकरणांचे डिझाइन, मानकीकरण आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करते. तसेच रेल्वे बोर्ड, क्षेत्रीय रेल्वे आणि उत्पादन युनिट्सना तांत्रिक सल्ला देते. ही ‘आयएसओ ९००१ प्रमाणित संस्था आहे. रेल्वे क्षेत्रासाठी ती जागतिक दर्जाची मानके तयार करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC Exam Paper Leak : दहावीचा गणिताचा पेपर तीन दिवस आधीच फुटला, टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका व्हायरल, बोर्डाच्या सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिह्न

Jalgaon : अंत्यसंस्काराला गेलेल्यांवर मधमाशांचा हल्ला, मृतदेह तसाच सोडून पळाले; १० जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : गॅस तुटवड्यावर तोडगा न निघाल्यास ठाण्यातील ७० टक्के हॉटेल्स बंद होणार

Gold Investment Returns : सोने गुंतवणुकीने दोन महिन्यांत तब्बल 28 हजारांचा परतावा; इराण-अमेरिका युद्धानंतरही भावात घसरण, सुवर्ण बाजारात अस्थिर वातावरण

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा उलटफेर! MCX बाजारात दर घसरले; आज 1 तोळा सोनं कितीला?

SCROLL FOR NEXT