पिंपरी-चिंचवड

वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचा मतदान करण्याचा निर्धार

CD

पिंपरी, ता.२ ः महापालिकेच्या ‘फ’ प्रभाग कार्यालयामार्फत इंद्रायणी वृद्धाश्रम व विकास अनाथ आश्रम येथे येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करा, असे आवाहन करण्यात आले. तसेच
‘चला मतदान करु या’ हा मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी नितीन गवळी, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, कार्यकारी अभियंता दमयंती पवार यांच्या सूचनेनुसार निवडणूक पर्यवेक्षक अमोल फुंदे, स्वीप अधिकारी पांडुरंग घुगे, दिनेश जगताप, स्वीप सहायक रवींद्र बोरकर, धनंजय गव्हाणे, सारिका गहाळ आणि दीपाली बिरारे यांच्या उपस्थितीत मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. वृद्धाश्रम प्रमुख माऊली हरकळ उपस्थित होते. प्रभाग १, ११, १२, १३ चे निवडणूक निर्णय अधिकारी नितीन गवळी यांनी मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्याकरिता विविध ठिकाणी मतदान जनजागृती करण्याच्या सूचना केल्या. त्या अनुषंगाने मतदार स्लीप वाटप, मतदार प्रतिज्ञा घेणे, पथनाट्ये, लोकशाही विषयक रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा राबवून तसेच मतदान माहिती पत्रक वाटप करून जनजागृती करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा दणका तरी ट्रम्प ऐकेनात, आता जगावर लावला १० टक्के ग्लोबल टॅरिफ

GAUTAMI PATIL: गौतमी पाटीलने पहिल्यांदा कोणत्या गाण्यावर डान्स केला माहितीय का? नाव ऐकून थक्क व्हाल?

Latest Marathi News Live Update : 'गोकुळ'कडून दुधाची दरवाढ; आजपासून नवी दर होणार लागू

Mushroom Soup Recipe: व्हिटॅमिन B2 आणि B3 ची कमतरता आहे? 20 मिनिटांत तयार होणारा स्वादिष्ट सूप आजच ट्राय करा!

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT