पिंपरी-चिंचवड

पिंपरी माघारी नंतरचे चित्र

CD

बहुतांश लढती भाजप विरुद्ध राष्ट्रवादी
सर्व प्रभागांत मिळून ६९२ उमेदवार निवडणूक रिंगणात

पिंपरी, ता. २ : पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी होत आहे. त्यासाठी सुमारे साडेपाच हजार अर्जांची विक्री झाली होती. त्यातील एक हजार ९९३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर, छाननीमध्ये ९९ अर्ज बाद झाले होते. अर्ज माघारीसाठी शुक्रवारी (ता.२) दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह ४४३ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. शेवटी ६९२ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. बहुतांश ठिकाणी भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा दुरंगी लढती होणार आहेत.

(दुरंगी लढती)
भाजप विरुद्ध राष्ट्रवादी
प्रभाग एक ब (सर्वसाधारण महिला) आणि क (सर्वसाधारण महिला)
प्रभाग दोनमधील अ (ओबीसी महिला), ब (सर्वसाधारण महिला), क (सर्वसाधारण)
प्रभाग तीनमधील ब (ओबीसी)
प्रभाग चारमधील ब (एसटी), क (ओबीसी महिला),
प्रभाग पाचमधील अ (ओबीसी महिला), ब (ओबीसी),
प्रभाग सहामधील क (सर्वसाधारण महिला), ड (सर्वसाधारण)
प्रभाग सातमधील अ (ओबीसी), ब (सर्वसाधारण महिला),
प्रभाग १८ अ (ओबीसी महिला)
प्रभाग २१ ब (ओबीसी)
प्रभाग २६ ब (ओबीसी महिला)
प्रभाग २७ ब (ओबीसी), ड जागा (सर्वसाधारण)
प्रभाग २८ ड (सर्वसाधारण)
प्रभाग २९ अ (एससी महिला), ब (एसटी महिला)

तिरंगी लढती
प्रभाग दोन क : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना.
प्रभाग तीन क : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना (ठाकरे). ड : भाजप- राष्ट्रवादी- आप
प्रभाग चार ड : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना
प्रभाग पाच क : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना (ठाकरे)
प्रभाग सात क : भाजप- राष्ट्रवादी- वंचित. ड : भाजप- राष्ट्रवादी- आप
प्रभाग आठ ब : भाजप- राष्ट्रवादी- वंचित
प्रभाग १४ ड : भाजप- राष्ट्रवादी- काँग्रेस
प्रभाग १५ ब : भाजप- राष्ट्रवादी- आप; क : भाजप- राष्ट्रवादी- मनसे
प्रभाग २१ क : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना (ठाकरे); ड : भाजप- राष्ट्रवादी- मनसे
प्रभाग २३ क : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना
प्रभाग २५ ड : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना (ठाकरे)
प्रभाग २६ अ, क आणि ड : भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष- आप
प्रभाग २८ : अ : भाजप- राष्ट्रवादी- काँग्रेस; ब : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना
प्रभाग २९ : क आणि ड : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना
प्रभाग ३१ : ब आणि क : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना
--
चौरंगी लढती
प्रभाग एक अ : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना (ठाकरे)- वंचित. ड : भाजप- काँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना (ठाकरे).
प्रभाग तीन अ : भाजप- राष्‍ट्रवादी- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस.
प्रभाग चार अ : भाजप- राष्ट्रवादी- काँग्रेस- वंचित
प्रभाग सहा अ : भाजप- राष्ट्रवादी- काँग्रेस- आप
प्रभाग १२ क : भाजप- राष्ट्रवादी- आप- रासप; ड : भाजप- राष्ट्रवादी- काँग्रेस- आप
प्रभाग १४ क : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)
प्रभाग १५ अ : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- कॉंग्रेस
प्रभाग १६ ब : भाजप- शिवसेना- काँग्रेस- मनसे
प्रभाग १८ ब : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस; क : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना (ठाकरे)- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
प्रभाग १९ क : भाजप- राष्ट्रवादी- बसप- आप

प्रभाग २० ब : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे); क : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)
प्रभाग २१ अ : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- वंचित
प्रभाग २२ अ : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- आप
प्रभाग २३ ब : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- वंचित
प्रभाग २३ ड : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस
प्रभाग २५ ब : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस; क : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- काँग्रेस
प्रभाग २७ अ : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- मनसे; क : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)
प्रभाग २८ क : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)
प्रभाग ३१ अ : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- बसप; ड : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)
प्रभाग ३२ ब आणि क : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)
--
पंचरंगी लढती
प्रभाग पाच ड : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस
प्रभाग नऊ ब : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
प्रभाग १० क : भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आप- सनय छत्रपती शासन
प्रभाग ११ क : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- सनय छत्रपती शासन; ड : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना (ठाकरे)- वंचित- आप
प्रभाग १२ अ : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस
प्रभाग १३ ब : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- वंचित; क : भाजप- शिवसेना- काँग्रेस- मनसे- वंचित
प्रभाग १४ अ : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- आप
प्रभाग १५ ड : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- काँग्रेस- आप
प्रभाग १६ क : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- काँग्रेस- वंचित
प्रभाग १७ क : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस
प्रभाग १८ ड : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना (ठाकरे)- आप- बहुजन भारत पार्टी
प्रभाग १९ ब : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस- वंचित
प्रभाग २२ ब : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- काँग्रेस- आप
प्रभाग २३ अ : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस
प्रभाग ३० ब : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- वंचित
प्रभाग ३२ अ : भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- वंचित
--


बहुरंगी लढती
प्रभाग ८ ः अ ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे), काँग्रेस- बसप- आप- वंचित, क ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)-काँग्रेस- वंचित-नॅशनलिस्ट रिपब्लिकन पार्टी; ड ः भाजप- राष्ट्रवादी- काँग्रेस- बसप- वंचित- सनय छत्रपती शासन- पिंपरी चिंचवड परिवर्तन आघाडी- स्वराज्य शक्ती सेना- वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया.
प्रभाग ९ ः अ ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना-शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष-बसप-वंचित- रिपब्लिकन सेना, क ः भाजप- राष्ट्रवादी-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष- बसप- वंचित, ड ः भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष- वंचित
प्रभाग १० ः अ ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस- आप- वंचित; ड ः भाजप- राष्ट्रवादी- बसप- मनसे- आप- वंचित
प्रभाग ११ ः अ ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- वंचित- सनय छत्रपती शासन; ब ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस- आप
प्रभाग १३ ः अ ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस- मनसे- बसप- वंचित- परिवर्तन आघाडी; ड ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- बसप- वंचित- बहुजन रिपब्लिकन पार्टी
प्रभाग १४ ः ब ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- भाकप- मनसे- आप
प्रभाग १६ ः अ ;ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- काँग्रेस- आप- वंचित- सनय छत्रपती शासन; ड ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- काँग्रेस- बसप- वंचित- आप- सनय छत्रपती शासन
प्रभाग १७ ः अ ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- काँग्रेस- बसप- आप; ब ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस- बसप- आप; ड ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस- बसप- आप
प्रभाग १९ ः अ ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना (ठाकरे)- मनसे- बसप- वंचित- परिवर्तन आघाडी; ड ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस- बसप- आप- वंचित- परिवर्तन आघाडी
प्रभाग २० ः अ ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष- आप- बसप- वंचित; ड ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- काँग्रेस- बसप- आप
प्रभाग २२ ः क ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस- आप- प्रहार जनशक्ती पक्ष- वंचित- हिंदूराष्ट्र संघ; ड ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस- वंचित
प्रभाग २५ ः अ ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस- आप
प्रभाग ३० ः अ ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष- आप- वंचित- परिवर्तन आघाडी; क ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- आप- मनसे- वंचित; ड ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- शिवसेना (ठाकरे)- काँग्रेस- आप- वंचित
प्रभाग ३२ ः ड जागा ः भाजप- राष्ट्रवादी- शिवसेना- काँग्रेस- मनसे- वंचित
--
प्रमुख पक्षांची माघार
प्रभाग दोनमधील शिवसेनेच्या (ठाकरे) कल्पना घंटे (ब जागा) आणि मोहम्मद खान (क जागा) यांनी माघार घेतली. प्रभाग दोन क मधील काँग्रेसचे जुनेद अहमद चौधरी यांनीही माघार घेतली. प्रभाग दोनमधील ड जागेवरील मनसेचे जयसिंग भाट आणि सनय छत्रपती शासन पक्षाचे संतोश धुमाळ यांनी माघार घेतली. प्रभाग सहा मधील ड जागेवरून शिवसेनेचे (ठाकरे) संदीप पाळंदे यांनी माघार घेतली. प्रभाग आठमधील ड जागेवरील मनसेचे प्रतिक जिते.
प्रभाग ११ मधील ड जागेवरून काँग्रेसचे गणेश भांडवलकर
प्रभाग १२ मधील ब जागेवरील शिवसेनेच्या सुजाता काटे
प्रभाग १५ अ जागेवरील काँग्रेसच्या शुभांगी शिंदे. प्रभाग २१ क जागेवरील शिवसेनेच्या ज्योतिका मलकानी. प्रभाग २३ ड जागेवरील शिवसेनेचे प्रशांत सपकाळ. प्रभाग २४ अ राष्ट्रवादीचे संतोष बारणे, ड जागेवरील मंगेश बारणे
--

प्रभाग २० मधील ब जागेवर निलम म्हेत्रे यांनी शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे.
--
प्रबाग १० ब (ओबीसी महिला) जागेवरील भाजपच्या सुप्रिया चांदगुडे बिनविरोध आल्या.
---
प्रभाग २४ ब जागेवर राष्ट्रवादीच्या वर्षा भोसले, क जागेवर माया बारणे उमेदवार आहेत. या जागांवर भाजपच्या अनुक्रमे .... गुजर व करिश्मा बारणे यांचे अर्ज दाखल करण्याच्या वेळेनंतर एबी फॉर्म दाखल केल्याने अधिकृत अर्ज अपक्ष धरण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai Virar Election : वसई–विरार महापालिका निवडणुकीत माघारींचा धडाका; २८६ उमेदवार बाहेर; ५४७ रिंगणात!

Pune Political : उमेदवारी नाकारताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात खदखद; पुण्यात बैठकीत इच्छुकांचा गोंधळ!

Satish Bahirat : एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पक्षनिष्ठेची, पुन्हा एकदा चर्चा!

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

SCROLL FOR NEXT