पिंपरी-चिंचवड

लग्नाचे आमिष दाखवून महिलेची ३१ लाखांची फसवणूक

CD

पिंपरी : एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून विविध कारणे सांगून बँकेतून कर्ज काढण्यास भाग पाडले. नंतर बँकेचे हप्ते न भरता महिलेची ३१ लाख २० हजार २५७ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना चिंचवड येथे घडली. या प्रकरणी चिंचवड परिसरात राहणाऱ्या एका महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जयेश पाटील उर्फ आदर्श प्रशांत म्हात्रे (रा. लोअर परेल, मुंबई व अलिबाग, जि. रायगड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने एका विवाह संकेतस्थळावरून फिर्यादीशी ओळख वाढवली. लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध कारणे सांगत एका बँकेतून कर्ज काढण्यास भाग पाडले. त्या कर्जाचे हप्ते स्वतः भरण्याची जबाबदारी घेतली. मात्र, नंतर हप्ते न भरता व पैसे परत न करता महिलेची ३१ लाख २० हजार २५७ रुपयांची फसवणूक केली.

मारहाणप्रकरणी तिघांना अटक
पिंपरी : लेबर कॅम्पमध्ये कामगारांमध्ये भांडण सुरू असताना त्यांना लेबर कॅम्‍प सोडून जा, असे सांगण्‍यासाठी गेलेल्‍या एका तरुणाला कामगारांनी फावड्याने बेदम मारहाण केली. ही घटना ताथवडे येथील महिंद्रा हॅप्पीनेस या बांधकाम साइटच्या लेबर कॅम्पमध्ये घडली. सूरज सुरेश चव्‍हाण (वय २८) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. तर दीपक रॉय, अब्दुल कलीम, मोहम्मद सलीम (सर्व रा. महिंद्रा हॅप्पीनेस बांधकाम साइट लेबर कॅम्प, जीवननगर, ताथवडे, मूळ- उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, जावेद अहमद याच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी अभिजित अशोक पिसाळ (रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी वाकड पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. लेबर कॅम्पमध्ये कामगारांचे भांडण सुरू असताना येथे काम करणारे सूरज चव्हाण व सुजय शिंदे हे दोघेजण तेथे गेले. भांडण करणाऱ्या कामगारांना कॅम्प सोडून जा, असे सांगितले असता तेथे असलेल्या आरोपींनी सूरज चव्हाण यांना फावड्याने बेदम मारहाण केली. यात त्यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली.

मोटार चालकाचा निष्काळजीपणा; सायकलस्वार जखमी
पिंपरी : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटारीचा दरवाजा अचानक उघडल्याने दरवाजाला धडकून सायकलस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना ताथवडे परिसरातील अशोकनगर परिसरात घडली. या प्रकरणी गणेश केरप्पा निर्मल (रा. ऑस्टिन पार्क, ताथवडे) यांनी वाकड पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोटार चालकावर गुन्‍हा दाखल केला आहे. फिर्यादी हे सायकलवरून जात असताना ते ताथवडे येथील अशोकनगर परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्‍या असलेल्या मोटारीतील चालकाने मागे न पाहता अचानक मोटारीचा दरवाजा उघडला. त्यामुळे या दरवाजाला फिर्यादी धडकल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

गांजाप्रकरणी दोघांना अटक
पिंपरी : विक्रीसाठी गांजा जवळ बाळगणारा व त्याला गांजा पुरविणाऱ्या दोघांना पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई तळवडे येथील गणेशनगर परिसरात करण्‍यात आली. राजेंद्र सुरेश पवार (रा. गणेश हाउसिंग सोसायटी, आझाद चौक, ओटा स्कीम, निगडी) व बळिराम मोहिते अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गणेशनगर येथे आरोपी राजेंद्र पवार हा विक्रीसाठी गांजा बाळगून उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून ४४६ ग्रॅम गांजा सापडला. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने हा गांजा आरोपी बळिराम मोहिते याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

बाबो...! 'हा' अभिनेता चक्क विकतोय सिलेंडर, १० लाख रुपयांना एक सिलेंडर आणि...

Latest Marathi News Live Update : धुळ्यात गॅस टंचाईमुळे लाकडांची विक्री वाढली

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Crime: 'अहो ऐका ना, भजी आणता का'? खाण्याच्या बहाण्याने पतीला बसमधून उतरवले, नंतर पत्नीने प्रियकरासोबत नको ते केले

SCROLL FOR NEXT