पिंपरी-चिंचवड

सिलिंडर टंचाईने इलेक्ट्रिक उपकरणांवर भर

CD

पिंपरी, ता. ११ : गॅस सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांनी पर्यायी उपकरणांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वस्तूंच्या दुकानांमध्ये विविध उपकरणे आणि संबंधित साहित्यांना मागणी वाढली आहे. यात इंडक्शन शेगडी आणि त्यासाठी आवश्यक कूकर, इलेक्ट्रिक कॉइल शेगडी, ओव्हन आणि इतर उपकरणांची मागणी वाढली आहे. यात इंडक्शनला मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
आखाती देशांतील युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम गॅस वितरणावर झाला आहे. व्यवसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. तर, घरगुती सिलिंडरसाठी बुकिंग कालावधी २१ दिवसांवरुन २५ दिवस केला आहे. गॅस सिलिंडरची मागणी लक्षात घेता काही गॅस वितरकांकडून साठेबाजी करुन कृत्रिम तुतवडा निर्माण केला जात असल्याचा आरोप होत आहे. व्यावसायिक वापराचे सिलिंडर मिळत नसल्याने काही व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत आहे. या स्थितीमुळे इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर नागरिकांनी सुरू केला आहे. सध्या एक हजार ते तीन हजार व्हॅटपर्यंतच्या इंडक्शन शेगडीला मागणी आहे. तर, मागणी वाढल्याने या उपकरणांच्या किंमती वाढल्याची स्थिती आहे.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून इलेक्ट्रिक उपकरणे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. सुमारे २५ ते ३० टक्के इंडक्शनची विक्री वाढली आहे.
- रमेश चौधरी, संचालक, सूर्या इलेक्ट्रॉनिक्स

PNE26W02735

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

Shaktipeeth Highway : "सागरेश्वर अभयारण्यातून 'शक्तिपीठ' नेण्याचा निर्णय तातडीनं बदला, अन्यथा फडणवीसांच्या 'वर्षा' निवासस्थानासमोर आत्मदहन करणार"

'नवऱ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते' चाहतीनं भर कार्यक्रमात शाहरुखला केलं प्रपोज, किंग खान म्हणाला...'एकट्यात सांगायचं ना...'

Latest Marathi News Live Update : बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राची चौकशी

SCROLL FOR NEXT