वादातून तरुणाला मारहाण
पिंपरी ः रहाटणी येथील बीआरटी रस्त्यावर दुचाकीचा अपघात झाल्यामुळे वादातून तरुणाचा गळा दाबून, पट्ट्याने मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी कुणाल पालवे (वय २७, रा. क्षितिज कॉलनी, जगताप डेअरी, रहाटणी, पुणे) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बाबू पाटील (वय ३०, रा. काळेवाडी, पुणे), अभिषेक माडगुळे (वय २२), विकी सुतार (वय ३०, दोन्ही रा. काळेवाडी, पुणे) आणि त्यांच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी दुचाकीवरून जात असताना दुसऱ्या दुचाकीशी त्यांचा अपघात झाला. यावेळी तिथे चारचाकीतून आलेल्या आरोपींनी ‘तुझीच चूक आहे’ असे म्हणत वाद घातला. बाबू पाटील याने फिर्यादीचा गळा दाबला, तर त्याच्या साथीदाराने कमरेच्या बेल्टने फिर्यादीच्या डोक्यावर आणि तोंडावर मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
ज्येष्ठ नागरिकाला दुचाकीची धडक; चालक फरार
पिंपरी ः निगडी येथील जुना पुणे-मुंबई मार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला अज्ञात दुचाकीस्वाराने धडक देऊन जखमी केले.
या प्रकरणी राहुल ढाणे (वय ४८, रा. लक्ष्मीनगर, निगडी गावठाण) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीचे वडील उत्तम ढाणे हे निगडी एसटी स्थानकासमोरून रस्ता ओलांडत होते. यावेळी दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून, अपघात घडल्यानंतर चालक मदतीसाठी न थांबता तिथून पळून फरार झाला.
तीन पिस्तुलासह तिघांना अटक
पिंपरी ः तळेगाव दाभाडे परिसरात बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणाऱ्या तीन तरुणांना गुन्हे शाखेने अटक केली.
सरदार सय्यद (वय २७, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे), विशाल कुडेकर (वय ३५, रा. अनावळे, खेड, पुणे) आणि प्रशांत सोनवणे (वय २८, रा. अनावळे, खेड, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस शिपाई हर्षद कदम यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शहरात शस्त्र वापरण्यास मनाई आदेश लागू असतानाही आरोपींनी त्याचे उल्लंघन केले. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना एक लाख ५० हजार रुपये किमतीचे तीन देशी बनावटीची पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.