पिंपरी-चिंचवड

जादा परताव्याच्या आमिषाने दोन कोटींची फसवणूक

CD

जादा परताव्याच्या आमिषाने दोन कोटींची फसवणूक

पिंपरी : शेअर ट्रेडिंग व आयपीओमध्ये गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची दोन कोटी नऊ लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी एका तरुणाने वडिलांच्यावतीने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या वडिलांना शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर वेगवेगळ्या शेअर ट्रेडिंग व आयपीओच्या नावाखाली फिर्यादीच्या वडिलांना बँक खात्यांत पैसे भरण्यास भाग पाडले. त्यानंतर ॲप्लिकेशनवर खोटा नफा दाखवून पैसे परत न देता फिर्यादीच्या वडिलांची दोन कोटी नऊ लाख ३० हजार ५३७ रुपयांची फसवणूक केली.

तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी : दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतानाही शहरात आलेल्या गुंडाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई चिंचवडमधील शंकरनगर येथे करण्यात आले. नीलेश मनोहर गायकवाड (रा. विद्यानगर, चिंचवड) असे अटक केलेल्या गुंडांचे नाव आहे. या गुंडांकडून एक कोयता पोलिसांनी जप्त केला आहे.

नफ्याचे आमिष दाखवून तीस लाखांना गंडा
पिंपरी : गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून तीस लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना चिखलीतील राजे शिवाजीनगर येथे घडली. या प्रकरणी एका व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिलेने फिर्यादीला एक ॲप इन्स्टॉल करण्यास सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आर्थिक गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यावर ३० लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, नंतर हे पैसे परत न देता फिर्यादीची फसवणूक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Vadhavan Highway Project : वाढवण महामार्गाचे केवळ 16 टक्केच काम पूर्ण; जमीन संपादनात नेमके अडथळे काय? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT