पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

ड्रेनेज विभाग कार्यालयाची दुरवस्था
पिंपरी गावातील कुदळे कॉलनी तीन समोरील यशवंतराव चव्हाण स्टेडियम मधील ड्रेनेज विभाग कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. कार्यालयाचे प्रवेशद्वार तुटलेले आहे, कार्यालय परिसराची नियमित स्वच्छता होत नसल्याने परिसरात कचरा, राडारोडा आणि घाण साचली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या समस्येची दखल घेऊन कार्यालयाच्या नियमित देखभाल व दुरुस्तीची व्यवस्था करावी.
- सुहास कुदळे, पिंपरीगाव
PNE26V95048


चौकातील रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी
महापालिकेच्या भोसरी एमआयडीसी क्षेत्रातील टी ब्लॉक मधील जुन्या पोस्ट ऑफिस चौकातून उजवीकडे वळल्या नंतर लगेचच रस्त्यावर केमिकल युक्त दुर्गंधी असलेले पाणी रस्त्यावर साचले आहे. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच पादचारी आणि दुचाकी चालकाच्या अंगावर हे दुर्गंधीयुक्त पाणी उडते. त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या परिसराची पाहणी करून येथे साचणाऱ्या पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावावी.
- बी. एस. पाटील
PNE26V95049

चेंबर सफाई नंतर राडारोडा रस्त्यावर पडून
भोसरी येथील क्रांतीसुर्यनगर दिघी रस्ता परिसरातील सर्व्हे नंबर २१३ येथील चेंबर मधील दगड आणि माती बाहेर काढून येथील प्रत्येक घरासमोर टाकण्यात आली आहे. चेंबर साफ करून माती काढून पाच ते सहा दिवस झाले आहे तरीही अद्याप येथील हा राडारोडा उचलण्यात आला नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने येथील राडारोडा उचलून परिसराची त्वरित स्वच्छता करावी.
- हरीश डोळस, दिघी रोड
PNE26V95051

स्वच्छतागृह असून अडचण नसून खोळंबा
चिंचवड येथील थरमॅक्स चौकातील महाराष्ट्र विद्युत महावितरणाच्या कार्यालयाजवळील सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. सामान्य नागरिकांना यांचा वापर देखील करता येत नाही. नियमित देखभाल दुरुस्ती अभावी हे स्वच्छतागृह वापरण्यायोग्य राहिले नाही. त्यामुळे महापालिकेने या समस्येची दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी.
सिराज शेख, आकुर्डी
PNE26V95055

लोखंडी रॉडमुळे अपघात
चिंचवड येथील जिजामाता पार्क परिसरातील प्लॉट नंबर ८७, सेक्टर नंबर १८ येथे बांधकामातील लोखंडी रॉड मागील काही दिवसांपासून सोसायटीच्या आवारात पडून आहे. हा रॉड नजरेस न आल्याने पायाला ठोकर लागून अपघात होण्याचे प्रकार घडत आहे.
- संभाजी शिंदे, चिंचवड
PNE26V95050

एसटी विभागाचे दुर्लक्ष
एसटी विभाग त्यांच्या आधुनिकीकरण आणि विकास योजनांचे सतत दावे करत असते. पण स्वतः च्या कर्मचाऱ्याला काम करायला आणि प्रवाशांना कशा प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देते, हे अशा प्रकारच्या दयनीय अवस्थेवरून दिसून येते. संबंधित चित्र हिंजवडी येथील पुणे-मुंबई महामार्गावरील पिकअप शेडचे आहे.
- मोहन गद्रे, तळेगाव दाभाडे
PNE26V95053

सिग्नल यंत्रणा चालू करावी
पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी, सृष्टी चौक मध्ये सिग्नल चे खांब बसविण्यात आले आहेत. हे खांब बसवून १५ दिवसांपेक्षा जास्त झाले पण अजूनही सिग्नल यंत्रणा चालू करण्यात आले नाही. ही सिग्नल यंत्रणा कधी चालू होणार याची नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने हि यंत्रणा लवकरात लवकर चालू करुन, नागरिकांची वाहतूक कोंडी मधून सुटका करावी.
- नितीन सोनवणे, पिंपळे गुरव
PNE26V95052

कायमस्वरूपी उपाययोजना हवी
मोशी येथील स्पाईन रस्ता परिसरातील टपऱ्या, हातगाडी, खाद्य पदार्थ व इतर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या टपऱ्या महानगरपालिकेने कायदेशीर कारवाई करून जप्त केलेल्या होत्या. परंतु काहीच दिवसात या विक्रेत्यांनी पुन्हा त्यांचा व्यवसाय या ठिकाणी थाटला आहे. या अतिक्रमणांचा स्पाईन रस्ता चौकातील बायपास रोडवर नेहमी वाहतुकीस अडथळा होतो. त्यामुळे महापालिकेने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
- चंद्रशेखर डुंबरे, मोशी
PNE26V95054

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash : सेन्सेक्स 1,048 अंकांनी कोसळला! गुंतवणूकदारांचे तब्बल 7.4 लाख कोटी रुपयांचे नुकसान; कोणते शेअर्स घसरले?

हे तुम्हाला माहित्येय का? सचिन तेंडुलकर, वसिम अक्रम एकाच संघाकडून श्रीलंकेविरुद्ध खेळले होते; India-Pakistan यांचा मिश्र संघ उतरलेला मैदानावर अन्..

RBI Rule: वसुली एजंट्सचे कर्जदाराशी गैरवर्तन सहन केले जाणार नाही; बँका आणि एजंटना इशारा, RBI कडून नवे नियम जारी

IND vs PAK : तो अपयशी होण्याची शक्यता अधिक आहे! पाकिस्तानी खेळाडू अभिषेक शर्माला म्हणाला, slogger...; केला अपमान

Latest Marathi News Live Update : मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांनी स्वीकारला पदभार

SCROLL FOR NEXT