पिंपरी, ता.१२ ः विकासनगर ज्येष्ठ नागरिक देहूरोड संघाच्या २० वा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. संघाच्या स्वरांजली भजनी मंडळाकडून भजन, गवळण सादर करण्यात आले.
महासंघाच्या अध्यक्ष वृषाली मरळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष अनिल बडगुजर, साउथ इंडियन असोसिएशनचे जयशंकर सिंह, संघाचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे उपस्थित होते. संघाच्या ‘मेरी आवाज सुनो’ या संगीत कार्यक्रमाची गणेश वंदनाने सुरुवात झाली. दरम्यान संघाच्या दिवंगत नऊ सभासदांना श्रद्धांजली अर्पण केली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल एम.डी. चौधरी, श्याम कांबळे, विशाल तरस, सुरेश लुनावत आणि शुभांगी वानखेडे यांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. त्यानंतर आशा बराटे यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित केले. संघातर्फे घेतलेल्या विविध खेळांमध्ये नैपुण्य मिळवलेल्या बापू देवरे, मकरंद छापेकर, रुक्मिणी वाघमारे, जगताप आदींना भेट वस्तू देण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेतील विजेते दिलीप रोकडे, पंढरीनाथ सानप, बसविराज धोत्रे यांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन संघाचे सदस्य विश्वास आंबेकर यांनी केले. संघाचे सचिव पंढरीनाथ सावंत यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.