पिंपरी-चिंचवड

घोरावडेश्वर येथून दोन हजारपेक्षा अधिक ‘प्लॅस्टिक’च्या बाटल्या गोळा

CD

पिंपरी, ता. २० ः शिवजयंतीच्या निमित्ताने स्थानिक युवकांनी घोरावडेश्वर डोंगरावर स्वच्छता अभियान राबवत सुमारे दोन हजार पेक्षा अधिक प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या गोळा केल्या. या मोहिमेत रवि मनकर व मणेश म्हस्के यांच्या सहकार्याने प्लॅस्टिक कचरा संकलित करण्यात आला. त्यांच्यासह काही स्वयंसेवकांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला.
घोरावडेश्वर डोंगर हा निसर्गरम्य व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा परिसर असून येथे दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. यंदा महाशिवरात्री निमित्त भाविकांनी घोरावडेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी हजेरी लावली होती. मात्र, दर्शनानंतर डोंगर परिसरात प्लॅस्टिकच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, रॅपर व इतर कचरा साठला होता. स्थानिक युवकांनी शिवजयंती निमित्ताने गुरुवारी (ता. १९) स्वच्छता मोहीम राबवली. डोंगरमाथ्यावर आणि पायवाटांवर विखुरलेला कचरा स्वयंसेवकांना गोळा केला. देवदर्शनास येताना श्रद्धेसोबत स्वच्छतेची जबाबदारीही पार पाडावी. शक्यतो प्लॅस्टिकचा वापर टाळून स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या व कापडी पिशव्या वापराव्यात. प्लॅस्टिक साहित्य सोबत आणलेच तर ते डोंगरावर किंवा परिसरात न टाकता कचराकुंडीत टाकावे, असे आवाहन करण्यात आले. प्रशासनाने या ठिकाणी कचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Stray Dog Attack : थरकाप उडवणारा व्हिडिओ! पुण्यात चिमुरड्यावर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला; कुत्र्यांनी लहान मुलाला घेरलं, पण शेवटच्या क्षणी...

Air India Office Snake Video : विलेपार्ले येथे एअर इंडिया कार्यालयात सात फूट लांबीचा साप आढळला अन्

Donald Trump Claim: भारत-पाक युद्ध मीच थांबवलं! ट्रम्प यांचा पुन्हा दावा; २००% टॅरिफची दाखवली भीती अन्...

IND vs SA, T20 WC: भारतीय संघ 'सुपर ८'मध्ये द. आफ्रिकेला चक्रावणारी स्ट्रॅटर्जी वापरणार; सूर्या असं करेल, याचा विचारच कुणी केला नसेल...

Bhiwandi Mayor: भिवंडी पॅटर्न! काँग्रेसच्या खेळीनं भाजप चितपट, नारायण चौधरींचा महापौरपदी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT