पिंपरी, ता.२१ ः भक्ती-शक्ती ते अंकुश चौक दरम्यान ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे गतिरोधक काढून टाकण्यात आले होते. याबाबत ‘सकाळ’मध्ये ‘गतिरोधके सपाट, वाहने मात्र सुसाट’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत महापालिका प्रशासनाच्या वतीने गतिरोधक बसविण्यात आले आहेत. परिणामी, सुसाट वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहणार आहे.
भक्ती-शक्ती येथून अंकुश चौकाकडे येताना तीव्र उतार आहे त्यातच गतिरोधक नसल्यामुळे वाहनांचा वेग अधिकच वाढत. रुपीनगरकडून निगडीकडे, तसेच यमुनानगरकडून रुपीनगरकडे जाणाऱ्या वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. या चौकातून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय बस, तसेच दिव्यांग व्यक्तीही नियमितपणे जातात. गतिरोधक नसल्यामुळे वेगात येणारी वाहने थेट चौकात प्रवेश करत असून अपघाताची शक्यता वाढली होती. वाहनांचा वेग चौकात आल्यावर नियंत्रित राहत नव्हता. त्यामुळे ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध बातमीचा दखल घेत या चौकात गतिरोधक बसविण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.