पिंपरी, ता. २० ः ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जरी विचार आत्मसात केला, तरी प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकते,’’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती यांनी केले. शिवचरित्रातील प्रसंगांच्या माध्यमातून आजच्या समाजजीवनात शिवरायांचे विचार किती उपयुक्त आहेत, याचे सखोल विश्लेषण देखील त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे महापालिकेच्या वतीने १५ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत विविध ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत चिंचवड येथील संभाजीनगर येथे ‘आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते, या कार्यक्रमात अविनाश भारती हे बोलत होते.
माजी महापौर मंगला कदम, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, नगरसेवक कुशाग्र कदम, उपायुक्त अण्णा बोदडे, साई किरण मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल नारखेडे, अजित कोडलकर, गिरीश तेलंग, गौरव कदम, संजय कलागते, नीलेश नारखेडे, मंगेश गुंजाळ आदी उपस्थित होते. साई किरण मित्र मंडळाचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.