पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

भोसरी-आळंदी मार्गावर धोकादायक खड्डा

भोसरी-आळंदी मार्गावर शास्त्री चौकात रस्त्यावरील चेंबरच्या शेजारी खड्डा पडला आहे. त्यामुळे दुचाकी व इतर वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिका प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन येथील खड्ड्याची दुरुस्ती करावी.
- यशवंत वाघ, चऱ्होली बुद्रूक
98515

खड्डे, अनधिकृत विक्रेत्यांमुळे पादचारी त्रस्त
पिंपळे सौदागर येथील महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वार समोर खड्डा पडला आहे. येथेच चेंबर दुरुस्तीचे देखील काम करण्यात आले आहे. परंतु हे चेंबर चोहोबाजूंनी सिमेंट वापरून बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहने जाताना अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मागील पाच महिने सिमेंटचा रस्ता बनविण्याचे काम चालू आहे. रस्त्यावरी अनधिकृत विक्रेत्यांमुळे पादचाऱ्यांना चालायला जागा राहिलेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने या परिसराचा पाहणी करून येथील चेंबर व्यवस्थित बसवावे तसेच खड्डा देखील दुरुस्त करावा.
- चंद्रकांत खोपडे, पिंपळे सौदागर
98516

विद्यूत केबल उघड्यावरच
वाकड येथील दत्त मंदिर रस्त्यावरील ट्रेड सेंटर समोर सतत वर्दळ असते. येथेच लहान मुलांची शाळा, दुकाने, दवाखाना देखील आहे. परंतु, या ठिकाणी विद्यूत केबल उघड्यावरच धोकादायक पद्धतीने टाकलेले आहेत. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने या परिसरात सुरक्षेबाबत योग्य ती उपाययोजना करावी.
- एक नागरिक, वाकड
98518
--------

रस्त्यावरील राडारोडा हटवावा
वाकड येथील कस्पटेवाडी ऑस्टीन प्लाझा समोर म्हसोबा देवस्थान लगत असलेल्या रस्त्यावर माती, खडी, मुरूम तसेच राडारोडा मागील अनेक महिन्यांपासून पडून आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहेत. मातीमुळे सतत धुळ उडत आहे. त्यामुळे प्रदूषण देखील वाढत आहे. या रस्त्यावरील माती, चिखल, मुरूम, खडी इत्यादी राडारोडा महापालिकेने हटवून हा रस्ता वाहतुकीस उपलब्ध करून द्यावा.
- एक नागरिक, कस्पटेवाडी वाकड
98520
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा; मनसेची मागणी

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT