पिंपरी, ता.२४ ः भोसरीतील गवळी माथा येथील रस्त्यावरील स्वच्छतागृहाबाहेर माणसांऐवजी वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येत असून स्वच्छतागृहातील पाण्याचा वाहने धुण्यासाठी गैरवापर केला जात आहे. परिणामी, स्वच्छतागृह आहे की वॉशिंग सेंटर ? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे. अशा प्रकारे होणाऱ्या पाण्याच्या नासाडीमुळे पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पिंपरी चिंचवड शहरात पाणी टंचाई सदृश्य स्थिती असताना दुसरीकडे सार्वजनिक स्वच्छतागृहातील पाण्याचा सर्रास वाहने धुण्यासाठी वापर केला जात आहे. या परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे २४ तास सुरू राहतात आणि तिथे पाण्याचा पुरवठा उपलब्ध असतो. पण, त्याचा वापर नागरिकांच्या सोयीसाठी होण्याऐवजी स्वच्छतागृहाबाहेर चारचाकी, रिक्षा, दुचाकी अशा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. गेल्या कित्येक महिन्यांपासून हे चित्र पाहायला मिळत आहे. वाहन चालक स्वच्छतागृहातील पाण्याने वाहने धुण्याचे काम करत आहेत. वाहने धूत असताना सर्व पाणी रस्त्यावर येते व तेथून चालणे कठीण होत आहे. अनेक लोकांची वाहने पाण्यावरून घसरली आहेत.
‘‘याबाबत वेळोवेळी तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्यानुसार दंडात्मक कारवाई केलेली आहे. पाणी बंद केल्यावर नागरिकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे तक्रारी आल्यावर प्रत्यक्षात जागेवर कारवाई केली जाते. पण, नागरिक ऐकत नाही. त्यांचे प्रबोधन करावे लागणार आहे.
- तानाजी दाते, सहाय्यक आरोग्य अधिकारी, ‘क’ क्षेत्रीय कार्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.