पिंपरी-चिंचवड

सात वर्षांच्या अर्पित चौधरीने पाहिले १६६ प्रकारचे पक्षी

CD

पिंपरी, ता. १ ः ज्ञानप्रबोधिनी विद्यालयातील सात वर्षीय विद्यार्थी अर्पित चौधरी याने गुजरातमधील ‘लिटल रण ऑफ कच्छ’ आणि नलसरोवर पक्षी अभयारण्य येथे पक्षिनिरीक्षणासाठी नुकतीच भेट दिली. या भेटीत त्याने एकूण १६६ प्रकारचे पक्षी पाहिले.
पक्ष्यांचे स्थलांतर, पाणथळ परिसंस्थांचे महत्त्व आणि निसर्गसंवर्धन याबाबत त्याला प्रत्यक्ष अनुभवातून शिकता आले. अर्पितने विविध स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांचे निरीक्षण केले. फ्लेमिंगोंच्या थव्यामुळे संपूर्ण सरोवरावर गुलाबी रंगाचा थर पसरल्याचे विहंगम दृश्य त्याला दिसले. ‘लिटल रण ऑफ कच्छ’ परिसरात कॉमन क्रेन व डेमोइझेल क्रेन यांची मंत्रमुग्ध करणारी संख्या पाहण्याचा अनुभव त्याला मिळाला. या दौऱ्यात त्याने अत्यंत दुर्मीळ असा एशियन हौबारा बस्टर्ड हा पक्षीही पाहिला.
विशेष म्हणजे भारतात या पक्ष्याच्या आतापर्यंत केवळ ८०० नोंदी उपलब्ध आहेत. इतक्या लहान वयात या दुर्मीळ पक्ष्याचे निरीक्षण व नोंद करणारा अर्पित हा देशातील कदाचित सर्वात लहान वयाचा पक्षी निरीक्षक असण्याची शक्यता आहे.
पालकांच्या मार्गदर्शनाखाली अर्पित पुस्तके, निरीक्षण आणि प्रत्यक्ष निसर्गभेटी यांच्या माध्यमातून पक्ष्यांबद्दल माहिती घेतो. मोबाईल व स्क्रीनपेक्षा निसर्गातून शिकणे अधिक उपयुक्त असल्याचे त्याचे पालक मानतात. अशा प्रकारच्या शैक्षणिक सहलींमुळे मुलांमध्ये निसर्गप्रेम, संवर्धनाची जाणीव आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते, असे ते नमूद करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karachi US Consulate Protest : कराचीतील अमेरिकन दूतावासात घुसले निर्दशक, सैनिकांच्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू

Chembur Accident: चेंबूर मजूर मृत्यू प्रकरण! विकसकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, महापौरांचे निर्देश

Latest Marathi News Update : जिल्हा परिषद सदस्य निवडीचा अधिकार पूर्णपणे सुनेत्रा वहिनींना - दत्तात्रेय भरणे

वयाने मोठी दिसते म्हणून सोनालीला हिंदी प्रोजेक्टमधून काढलं ; "मला फिलर्स वापरायचा सल्ला.."

Lasalgaon News : इराण-अमेरिका युद्धाचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना; दुबई विमानतळ बंद झाल्याने भाजीपाला निर्यात ठप्प

SCROLL FOR NEXT