पिंपरी-चिंचवड

नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे पडतेय महागात

CD

पिंपरी, ता. २६ : शहरातील वाढती वाहनसंख्या आणि अपुरी पार्किंग व्यवस्था यामुळे नो पार्किंगमध्ये वाहने उभी करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. परिणामी प्रमुख रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये वारंवार वाहतूक कोंडी होत असून, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांकडून नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई केली जात आहे. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत नो पार्किंगमधील दोन लाख २५ हजार ४९८ वाहनांवर कारवाई केली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये मध्यवर्ती भागासह परिसरातील मुख्य रस्त्यांवर नो पार्किंगमध्ये वाहने उभी केलेली असतात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अनेकदा रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने किंवा बसला मार्ग काढताना अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी तर नो पार्किंगचा फलक असलेल्या ठिकाणीच वाहन उभे केलेल्या वाहनांवर टोइंगद्वारे कारवाई केली जात आहे. नो पार्किंगमध्ये वाहन आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारला जातो. त्यासोबतच वाहन टोइंग केल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागते. वारंवार नियमभंग करणाऱ्यांची नोंद ठेवून त्यांच्यावर अधिक कडक कारवाई केली जात आहे.

मोबाईल क्रमांकावर दंडाची सूचना
ट्रॅफिक बडी चाट बॉट तसेच शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनेही उल्लंघन करणाऱ्या वाहनांची नोंद केली जात आहे. ई-चलन प्रणालीद्वारे वाहनधारकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर दंडाची सूचना पाठविली जाते.

‘‘रस्त्याच्याकडेला ‘नो पार्किंग’ फलक असल्यास तेथे वाहन उभे करू नये. नियमांचे पालन केल्यास दंड आणि अनावश्यक त्रास टाळता येईल.
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड

जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील कारवाई
महिना कारवाई
जानेवारी २०९३२
फेब्रुवारी १६४४५
मार्च १८७९९
एप्रिल १७४५८
मे १७४१४
जून १८०६८
जुलै १९०४८
ऑगस्ट १९३५२
सप्टेंबर १९९१८
ऑक्टोबर १९५७३
नोव्हेंबर १८६२१
डिसेंबर १९८७०
एकूण २२५४९८
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''आम्हांला काही पुरावे सापडले आहेत'', अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडीची पत्रकार परिषद

Nagpur Court: थकीत फीसाठी विद्यार्थिनीला शाळेतून काढणे बेकायदेशीर; उच्च न्यायालय, शिक्षणाचा अधिकार सर्वोच्च अधिकार असल्याचे निरीक्षण

लोकप्रिय अभिनेत्रीला मालिका सेटवर अपमानास्पद वागणूक; स्वत:च केला मोठा खुलासा!

Latest Marathi News Live Update : हिंमत असेल तर वाळू माफिया बंद करा!" ; एकनाथ खडसेंचं सरकारला थेट चॅलेंज

नवरा असावा तर असा! घरातील काम करताना दिसले अविनाश नारकर, Viral Video होताच कौतुकाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT