पिंपरी-चिंचवड

जुना उर्से टोलनाका परिसरात बेकायदा पार्किंगचा वाढता धोका

CD

सोमाटणे, ता. २७ ः द्रुतगती मार्गावरील उर्से पेट्रोलपंप ते टोल नाका दरम्यान रस्त्यावर उभी केलेली वाहने धोकादायक ठरत आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर अपघात टाळण्यासाठी नादुरुस्त व अपघातग्रस्त वाहनाशिवाय अन्य वाहनांना सेवा रस्त्यावर थांबण्यास प्रतिबंध लावण्यात आला होता. वाहनचालकांनी या नियमाचे उल्लंघन केल्यास महामार्ग पोलिसांकडून दंडात्मक कारवाई देखील केली जात होती. या कारवाईच्या भीतीमुळे वाहनचालकांकडून नियमाचे पालन केले जात असे. दरम्यानच्या काळात टोल नाक्यावर होणारी वाहनांची गर्दी विचारात घेऊन रस्ते विकास महामंडळाने सहा महिन्यापूर्वी उर्से टोलनाक्याचे स्थलांतर करण्यात आले. या स्थलांतरानंतर महामार्ग पोलिस, आयआरबी संरक्षण यंत्रणा, देवदूत यंत्रणा यांचेही नवीन टोलनाक्यावर स्थलांतर करण्यात आले. महामार्ग पोलिसांचे स्थलांतर झाल्यानंतर या रस्त्यावर कारवाईसाठी पोलिस यंत्रणा नसल्याचा फायदा घेत अनेक वाहन चालकांनी जुना उर्से टोलनाका परिसरात रस्त्यालगत वाहने उभी करण्यास सुरुवात केली आहे. काही वेळा जागेअभावी अनेक वाहनचालक तीन नंबरच्या लेनवर वाहने उभी करतात. यामुळे मुंबईच्या दिशेने आलेली वाहने या वाहनावर आदळून अपघात होण्याचा धोका वाढला आहे.


सेवा रस्त्यावर वाहने उभी केल्यास वाहनचालकांना समज दिली जाते, प्रसंगी कारवाई देखील केली जाते.
- शिवप्रसाद पवार, सहायक पोलिस निरीक्षक महामार्ग

PNE26V99349

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT