मुलीच्या मैत्रिणीनेच चोरले
अडीच लाख रुपयांचे दागिने
पिंपरी : मुलीच्या मैत्रिणीनेच घरातून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे दागिने चोरल्याचा प्रकार चिंचवडमध्ये घडला. याप्रकरणी एका महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या मुलीची मैत्रीण नेहमी त्यांच्या घरी यायची. याचा गैरफायदा घेत मैत्रिणीने फिर्यादीच्या घरातील कपाटातील दोन लाख ४१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले.
--------------
पत्नी, मुलाला घरात ठेवल्याने
मोशीत मेहुणीला बेदम मारहाण
पिंपरी : पत्नी व मुलाला घरात आधार दिल्यावरून मोशीमध्ये एकाने मेहुणीला बेदम मारहाण केली. याप्रकरणी एका महिलेने भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी समाधान रामराव सोनुने (रा. पिंपळनेर, ता. लोणार, जि. बुलडाणा) याच्यावर गुन्हा दाखल केला. फिर्यादी या त्यांची बहीण व बहिणीच्या मुलासोबत राहतात. आरोपीने तेथे येऊन मेहुणीला रॉडने बेदम मारहाण केली. त्यांच्या हातातील मोबाईल व गळ्यातील सोनसाखळी हिसकावून आरोपी पसार झाला.
-------------------
मोशीगावात गांजासह दोघांना अटक
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अमली विरोधी पथकाने गांजा बाळगलेल्या दोघांना मोशीगावात अटक केली. त्यांनी ओडिशामधून विक्रीसाठी आणलेला दोन लाख सात हजार रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला. सूरज रवी सिंग (रा. म्हाळुंगे), रणजित कुमार सिंग (रा. निघोजे) अशी आरोपींची नावे आहेत. मोशीगावातील कमानीसमोरील रस्त्यालगत उभारलेल्या दोघांकडे गांजा असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
--------------------------------------
हिंजवडीत दिड लाखांचा गांजा जप्त
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने एका आरोपीकडून सुमारे दीड लाख रुपयांचा गांजा जप्त करून त्याला अटक केली. त्याच्याकडून १ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. हिंजवडीतील ढवळेनगर येथील येळवंडे वस्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली. विकास दत्तात्रय बोत्रे (रा. येळवंडे वस्ती, ढवळेनगर, हिंजवडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या घरात गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.