पिंपरी-चिंचवड

बदलत्या हवामानामुळे आंबा पीक धोक्यात

CD

सोमाटणे, ता.१ ः सततच्या बदलत्या हवामानामुळे पवनमावळातील आंब्याच्या मोहर काळवंडले असून त्यामुळे आंब्याचे उत्पादन घटण्याचा धोका वाढला आहे.
मागील दोन महिन्यापासून थंडी कमी होऊन तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच वातावरणात सतत बदल सुरु झाला आहे. या बदलामुळे फुलोऱ्यात आलेल्या आंबा पिकावर रोग पडला असून आंब्याचा मोहर गळून गेला आहे. पानावरही रोग पडला असून पाने पिवळसर पडली असून ती गळण्यास सुरुवात झाली आहे. या रोगामुळे पवनमावळातील आंबा पीक धोक्यात आले असून उत्पादन घटण्याचा धोका वाढला आहे. या रोगाचा सर्वाधिक फटका गावरान आंब्यास बसला असून या आंब्याचा आकार वाढलेला असल्याने त्यावर औषध फवारणी करणे शक्य नाही. त्यामुळे या वर्षी आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता सांगवडे येथील शेतकरी सुरेश राक्षे यांनी वर्तवली आहे.

PNE26V99909

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belhe Jejuri Highway : बेल्हा-जजुरी महामार्गावरील नवीन पुलाचे काम अद्याप अपुर्णच; नदीला पुर आल्यास नागरिकांची होणार गैरसोय..

Ambajogai Crime : मंच्युरियनमधून दिलं गुंगीचं औषध, मग फोटो-व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; अंबाजोगाईतील 'त्या' 20 वर्षीय तरुणीसोबत काय घडलं?

Latest Marathi News Live Update : बुलढाणा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 5.78 लाखांचा गुटखा जप्त

कसलं भारी! मराठमोळ्या अभिनेत्याने दादरमध्ये सुरू केलं हॉटेल; मिळणार अस्सल मालवणी पदार्थ; नाव तर एकदम युनिक

Love Numerology : 'या' मुलांकाचे लोक जोडीदारावर करतात प्रचंड प्रेम; धोका देणं तर लांबच, जरासुद्धा दुखावत नाहीत

SCROLL FOR NEXT