पिंपरी, ता. १ : देहूगाव येथे येत्या गुरुवारी (ता. ५) श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त अनेक भाविक वाहने घेऊन सहकुटुंब दर्शनासाठी येतात. देहूगाव परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेने बुधवारी (ता. ४) दुपारी एक ते शुक्रवारी (ता. ६) रात्री बारा या तीन दिवसांच्या कालावधीत वाहतूक मार्गात बदल केले आहेत. प्रवेश बंद असलेल्या मार्गावर सार्वजनिक बस व दिंडीतील वाहनांनाच प्रवेश देण्याची व्यवस्था असेल.
प्रवेश बंद असलेले मार्ग व कंसात पर्यायी मार्ग :
- देहूगाव कमान (जुना मुंबई-पुणे महामार्ग) येथून देहूगावकडे (भक्ती शक्ती चौक त्रिवेणीनगर चौक मार्गे)
- महिंद्रा सर्कलकडून फिजुत्सु कॉर्नर अथवा कॅनबे चौक/आयटी पार्क चौकाकडे (महिंद्रा सर्कल-निघोजे- मोईफाटा मार्गे-डायमंड चौकमार्गे)
-तळेगाव-चाकण रस्त्यावरील देहूफाटा येथून देहूकडे (एच. पी. चौक मार्गे)
- आयटी पार्क/कॅनबे चौकाकडून काळोखे पाटील चौकाकडे (कॅनबे चौकाकडून महिंद्रा सर्कल एचपी चौक मार्गे)
- त्रिवेणीनगर चौक निगडी कडून तळवडे चौकाकडे (त्रिवेणीनगर कडून संविधान चौक-कृष्णानगर चौक मार्गे)
- डायमंड चौकाकडून देहूकडे (डायमंड चौकाकडून कुदळवाडी सर्कल मार्गे)
- देहू कमान-१४ टाळकरी कमान-इंद्रायणी पूल- हॉटेल कॉर्नर मार्गावरून (स्थानिक रहिवासी अंतर्गत रस्त्याचा वापर करतील)
- १४ टाळकरी कमान-भैरवनाथ चौक मार्गे प्रवेश बंद
- काळोखे पाटील चौक ते देहू मुख्य कमान ते परंडवाल चौक रस्ता बंद
- जुना पालखी मार्ग (कंद पाटील चौक) ते झेंडेमळा (जकातनाका) जाणारी सर्व वाहतूक एकेरी मार्गा. झेंडे मळ्याकडून कंद पाटील चौकाकडे वाहनांना प्रवेश बंद.
---
पार्किंग व्यवस्था
- आळंदी तळवडे कडून येणाऱ्या वाहनांसाठी माऊली वजन काटा, काळोखे पाटील चौक (खंडेलवाल चौक), तेथेच पीएमपीएल बस
- आळंदी तळवडे कडून येणाऱ्या वाहनांसाठी गायरान पार्किंग तसेच पीएमपीएल बस
- जुना पुणे मुंबई महामार्ग देहुकमान येथून येणाऱ्या वाहनांसाठी राधाकृष्ण लॉन्स शेजारील सीओडीच्या जागेत, तसेच पीएमपीएल बस पार्किंग असेल.
- चाकण-तळेगाव रस्त्यावरील देहूफाटा येथून येणाऱ्या वाहनांसाठी सप्तपदी लॉन्स, येलवाडी शॉपिंग कॉम्प्लेक्स, दिगंबरा डेव्हलपर्स व भागिरथी लॉन्स, तसेच साईराज चौक ते देहूफाटा या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेली हॉटेल शॉपिंग कॉम्प्लेक्स
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.