पिंपरी, ता. १५ ः ‘डोळे ठेवा निरोगी, खा! आंबा, पपई, गाजर ,कोबी’ या पथनाट्यातून पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानासमोर नागरिकांमध्ये आरोग्याविषयक जागृती करण्यात आली. दिलासा संस्था, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
या पथनाट्यात सांगवी, पिंपळे गुरव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप नन्नवरे, मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे अध्यक्ष अण्णा जोगदंड, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, संगीता जोगदंड, मुरलीधर दळवी, श्यामराव सरकाळे आदी सहभागी होते.
डोळे ही परमेश्वराने माणसाला दिलेली अमूल्य देणगी आहे. डोळे निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाच्या आहारात ‘अ’ जीवनसत्त्व असणे गरजेचे आहे. असे मत नन्नवरे यांनी व्यक्त केले.
उदय ववले, हिरामण देवरे, आरोग्य विभागाचे निरीक्षक शंकर घाटे, रश्मी तुंडलवार, उमेश बोरसे, नीलेश हंचाटे, राहुल ओव्हाळ, सुभाष चव्हाण, पंकज पाटील, महंमद मुलानी, बाळासाहेब साळुंके, संजय गमे यांची यावेळी उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.