पिंपरी,ता. १२ ः राज्याचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. खराळवाडी येथील पक्षाचा कार्यालयात शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी औद्योगिक विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला, ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांसह शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घातली, असे मत बहल यांनी व्यक्त केली. महिला अध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे, नगरसेविका उज्वला ढोरे, दीप्ती कांबळे, वर्षा जगताप आदींसह शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे यांनी तर आभार उपाध्यक्ष अकबर मुल्ला यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.