पिंपरी, ता. १३ ः भोसरी, पिंपरी आणि चिंचवड औद्योगिक क्षेत्रात अर्धवट आणि नियोजनशून्य कारभारामुळे रस्त्यावरील उघड्या चेंबरने डोके वर काढले आहे. औद्योगिक पट्ट्यातील कामगार दिवस व रात्र पाळीत काम करतात. या रस्त्यावरून रात्री घरी जाताना कामगारांना उघड्या चेंबरचा सामना करावा लागत आहे. अंधारात काही वेळा चेंबर दिसून येत नसल्याने कामगारांचा अपघात झाल्याचा घटना देखील घडल्या आहेत. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहरात बहुतांश ठिकाणी चेंबर तुटलेले आहे. या चेंबरची दुरुस्ती करण्यास महापालिकेच्या अधिकारी टाळाटाळ करत असल्याची तक्रार होत आहे. चेंबरची दुरुस्ती करण्याऐवजी फक्त झाकण बाजूला ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी अनेक वाहने अडकली असून काही नागरिक पाय घसरून चेंबरमध्ये पडल्याच्या घटना घडल्या आहेत. उघड्यावर ठेवण्यात आलेले चेंबर पादचाऱ्यांना व वाहनचालकांसाठी जीवघेणे बनले आहे. या चेंबरची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
पंधरा दिवसांत पुन्हा तुटले चेंबर
टेल्को कंपनी यशवंतनगर या भागातील धोकादायक चेंबरची दुरुस्ती केली होती. गुलाबपुष्प उद्यानाकडील चेंबर पंधरा दिवसांत पुन्हा तुटले आहे. निगडी-भोसरी रस्त्यावरील टाटा मोटर्स जवळील चेंबर देखील धोकादायक अवस्थेत असून रात्रीच्या वेळी दिसत नाहीत.
औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यावरून जाताना अंधारात या उघड्या चेंबरमध्ये पडून अपघाताची होण्याची शक्यता आहे. पुरेशी प्रकाशयोजना नसल्याने अपघात, गंभीर अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांसाठी अपघात मुक्त रस्ता बनवावा.
- बाबूराव पाटील, कामगार संभाजीनगर
यशवंतनगरच्या मार्गावर चेंबर खचून खड्डा तयार झाला आहे, त्यामुळे रात्रीचे वेळेस अपघात होतात. संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन धोकादायक चेंबर दुरुस्ती करण्याची कारवाई करण्यात यावी.
- लाला परब, कामगार यशवंत नगर
टेल्को कंपनी यशवंतनगरपासून ते गवळीमाथा दरम्यान सखल भाग आहे. या भागातील नैसर्गिक वाहणाऱ्या नाल्यांचा ओघ त्याच भागातून जातो. त्यामुळे नैसर्गिक नाल्यांच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उघड्या चेंबरला तात्पुरते कॉंक्रिटीकरण केले आहे. यापैकी नादुरुस्त चेंबर दुरुस्त केले जातील.
- अभिमान भोसले, कार्यकारी अभियंता, शहरी दळणवळण विभाग महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.