पिंपरी-चिंचवड

बीआरटी रस्त्यावर तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

CD

पिंपरी, ता. ८ ः रस्ता ओलांडताना महाविद्यालयीन तरुणाचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. मंगळवारी (ता. ७) दुपारी साडेतीनच्या सुमारास सांगवी फाटा येथील बीआरटी बस स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली. सोहम दीपक व्यास (वय २०, रा. सांगवी) असे मृताचे नाव आहे. तो बीआरटी रस्ता पायी ओलांडत होता. मनाई असूनही बीआरटी रस्त्यावर आलेल्या वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. तो बावधन येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये डेटा सायन्स शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत होता. महाविद्यालय सुटल्यानंतर तो घरी जात होता. त्यानंतर वाहनचालक पसार झाला. नागरिकांनी सोहमला तातडीने औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Abuse: ऑर्केस्ट्रा, डान्स ग्रुप आणि स्पामध्ये बालकामगारांवर बंदीची मागणी; सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि NHRC ला नोटीस

‘पेद्दी’मधील राम चरण, जान्हवी कपूर आणि श्रुती हासन यांचे धमाकेदार डान्स नंबर ‘हेल्लाल्लालो’ रिलीज!

Kolhapur Accident : गगनबावड्यात भरधाव ट्रकचा कहर; दुचाकीस्वार ठार, सात वाहनांचे नुकसान व दोन गायींचा मृत्यू

Farmer Endlife : व्याजाच्या पैशांच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले; पाच सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल

Strait of Hormuz: 'होर्मुज'ची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणने घातली 'ही' अट; जगभरातले देश टेंन्शनमध्ये

SCROLL FOR NEXT