पिंपरी-चिंचवड

खासगी ट्रॅव्हल्सकडून ‘द्रूतगती’ने भाडेवाढ

CD

काळेवाडी, ता. ८ : बहुतेक शाळांना उन्हाळी सुट्टी लागल्याने गावाकडे किंवा पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन सुरू झाले आहे. मात्र, त्याचाच गैरफायदा घेत अनेक खासगी ट्रॅव्हल्स बस कंपन्या दुप्पट ते तिप्पट भाडेवाढ करुन सर्वसामान्य प्रवाशांचा खिसा कापत आहेत. त्याबाबत पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पथकाची नेमणूक केली आहे. मात्र, कारवाईची गती अतिशय ‘संथ’ असल्याचे दिसून येत आहे.
काळेवाडी परिसरात जवळपास ६० ते ७० खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांची तिकीट आरक्षण कार्यालये आहेत. दरवर्षी उन्हाळी सुट्टीत त्यांच्याकडून प्रवाशांना वेठीस धरून राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियमांपेक्षा जास्त दराने भाडे आकारणी केली जाते. मात्र, त्यावर ‘आरटीओ’कडून ठोस कारवाई केली जात नसल्याचेच प्रवाशांना निदर्शनास येत आहे.

प्रवाशांचे म्हणणे काय ?
- विविध ऑनलाईन पोर्टल, ॲपवर खासगी ट्रॅव्हल्स बसचे तिकीट दर प्रदर्शित
- ऑनलाईन पोर्टलवर मागील आसनांचे कमी भाडे, पुढील आसनांचा दर मूळ भाड्यापेक्षा दुप्पट - तिप्पट
- भाववाढ केल्याचे निदर्शनास, मात्र परिवहन विभागाकडून कारवाई नाही
- ऑनलाइन पोर्टलवर भाडेवाढ केलेल्या वाहन क्रमांक दिलेला नसल्याचे परिवहन विभागाकडून कारण
- ट्रॅव्हल बसवरील कारवाई सार्वजनिक न करता तपासणी व कारवाई भाग म्हणून दडपली जाते

नियमांना बगल
उन्हाळी सुट्टीसाठी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना भाडे आकारण्यासाठी प्रशासनाने एक सामान्य दर आखून दिला आहे. त्यापलीकडे त्यांना भाडे आकारता येत नाही. परंतु ऑनलाईन पोर्टलवर कोणत्याही बसचा क्रमांक न टाकता आरक्षित सीटांची उपलब्धता दाखवण्यात येते. बुकिंग झाल्यानंतर प्रवासी बसमध्ये बसण्याअगोदर तिचा क्रमांक देऊन ट्रॅव्हलचालकांकडून नियमांना बगल दिली जाते.


पिंपरी चिंचवड परिवहन विभागाकडून खासगी ट्रॅव्हल्सकडून जास्त भाडे आकारल्यास कारवाई करण्यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची भाडेवाढ केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद देण्यात आली आहे. प्रवाशांना काही अडचण असल्यास त्यांनी तक्रार दाखल करावी, कारवाई करण्यात येईल.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड

नियमित भाडेदर/ वाढवलेले भाडेदर
- जळगाव ः ४०० ते ६०० / १२०० ते १४००
- बुलढाणा ः ६०० ते ५०० / १३०० ते १५००
- अकोला ः ६०० ते ७०० / १२०० ते १३००
- नागपूर ः ७०० ते ९०० / १७०० ते २२००
- कोल्हापूर ः ४०० ते ५०० / १००० ते १२००
- उदगीर ः ४०० ते ५०० / १००० ते १५००
- इंदूर ः ९०० ते १००० / २५०० ते २९००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT